Chat GPT: चॅटजीपीटीचं पाचवं व्हर्जन लॉंच; उत्तर मिळणार अचूक, ओपन एआयचा दावा

GPT 5 Version Launch: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर शेती क्षेत्रात होऊ लागला आहे. शेतीमध्ये एआयमुळे नवनवीन प्रयोग करण्यात येऊ लागले आहेत. त्यातच आता ओपनएआय कंपनीने गुरुवारी (ता.७) एआय मॉडेल चॅटजीपीटीचं पाचवं व्हर्जन लॉन्च केलं आहे.
ChatGPT 5
ChatGPT 5Agrowon
Published on
Updated on

Pune News: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर शेती क्षेत्रात होऊ लागला आहे. शेतीमध्ये एआयमुळे नवनवीन प्रयोग करण्यात येऊ लागले आहेत. त्यातच आता ओपनएआय कंपनीने गुरुवारी (ता.७) एआय मॉडेल चॅटजीपीटीचं पाचवं व्हर्जन लॉन्च केलं आहे. या व्हर्जनमध्ये वापरकर्त्याला तज्ञांसारखे उत्तर देण्याची क्षमता असल्याचे ओपनएआचे कार्यकारी संचालक सॅम ऑल्टमन यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतातील शेतकऱ्यांना समोर ठेवून किसान जीपीटीसारखे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामुळे चॅटजीपीटीचा वापर शेतकरी शेतीच्या प्रश्नासाठी करत आहेत. तसेच विविध चॅटबॉट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती मिळत आहे.

ChatGPT 5
Ai in Agriculture: ‘एआय’च्या प्रसारासाठी समन्वय गरजेचा : कृषी आयुक्त मांढरे

या पार्श्वभूमीवर चॅटजीपीटीने पाचवं व्हर्जन लॉंच केल्याने शेतकऱ्यांकडून एआय चॅटबॉटचा वापर केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांना यावर विविध माहिती सध्याही मिळते. परंतु त्या माहिती किती अचूक आणि अधिकृत आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी चॅटजीपीटी वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.

चॅटजीपीटीचं पाचवं व्हर्जन अधिक अचूक, वेगवान आणि अधिक तर्कसंगत आहे, असं ऑल्टमनने सांगितलं आहे. तसेच भारताचा उल्लेख करत चॅटजीपीटीसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ असून पुढील काळात जागतिक स्तरावर सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

ChatGPT 5
ChatGPT : 'चॅटजीपीटी'सारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने का होत आहे?

दोन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीने चौथ्थं व्हर्जन लॉन्च केलं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ओपन एआयने आता पाचवं व्हर्जन लॉंच केलं आहे. त्यामुळे वापरकर्ते अधिक अचूक वापर करू शकतील, असं ऑल्टमन यांनी सांगितलं आहे.

भारत ही वेगाने वाढत जाणारी मोठी बाजारपेठ आहे. भारतातील लोक आणि व्यवसाय वेगाने एआच तंत्रज्ञान स्वीकारत आहेत. अमेरिकेनंतर भारत ही आमची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पाचवं व्हर्जन अधिक अचूक, वेगवान, तर्कसंगत आहे.
सॅम ऑल्टमन, कार्यकारी संचालक, ओपन एआय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com