ChatGPT : 'चॅटजीपीटी'सारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने का होत आहे?

चॅटजीपीटी वापरकर्त्यांची संख्या फक्त दोन महिन्यात १० कोटी प्रति महिना झाली आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने त्याचा प्रसार होत आहे !
ChatGPT
ChatGPTAgrowon

Chatgpt : चॅटजीपीटी वापरकर्त्यांची संख्या फक्त दोन महिन्यात १० कोटी प्रति महिना झाली आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने त्याचा प्रसार होत आहे !

इंटरनेट , फेसबुक, व्हॉट्सअॅप , इंस्टाग्राम , टिकटॉक अशी अनेक अॅप्स , इतकया वेगाने आपल्या घट्ट लावून घेतलेल्या घराच्या दारे खिडक्यांच्या फटीतून येऊन आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आपल्याला कळले नाही.

आता त्यात भर पडणार आहे चॅटजीपीटी या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित अॅपची. नवीन तंत्रज्ञानाच्या प्रसार किती वेगाने होत आहे हे मोजण्याचे विविध मापदंड आहेत ; त्यात एक आहे किती दिवसात ग्राहकांची संख्या १०० मिलियन्स / म्हणजे १० कोटी प्रति महिना पर्यंत पोचली

इंस्टाग्रामला पोचायला ३० महिने लागले . टिकटॉकला ९ महिने आणि आता चॅटजीपीटीला दोन महिन्यापेक्षा कमी

ओपन एआय (OpenAI) कंपनीने ४ डिसेंबर २०२२ रोजी हे अॅप लाँच केल्यानंतर जानेवारी महिन्यातच त्याच्या ग्राहकांची संख्या १०० मिलियन्स पोचली , आणि त्याचा प्रसार आत्यंतिक वेगाने होत आहे.

ChatGPT
ChatGPT Subscription: आता 'चॅट जीपीटी'साठी पैसे मोजावे लागणार; पण तरीही तुम्ही वापरू शकता अगदी मोफत!

आपले प्रॉडक्ट लवकरात लवकर जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी बराच काळ ते फुकटात उपलब्ध करून दिले जाते, लोकांना त्याचे व्यसन लागेपर्यंत. हा मार्केटिंगचा फंडा अगदी मागच्या शतकातील अफूच्या बाजारापर्यंत जातो.

तोच फंडा ओपन एआय वापरणार आहे. ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे आमच्या सर्व्हरवर ताण येत आहे ; त्यामुळे ग्राहकांमध्ये फरक करावा लागेल ; जे ग्राहक २० डॉलर / प्रति महिना फीज देतील त्यांना प्राधान्याने सेवा देण्यात येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

पुढच्या वर्षभरात यातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी डॉलरवर पोचेल अशी आशा कंपनी बाळगून आहे.

गुगल , चीनची बायडू याच पद्धतीची अॅप्स नजीकच्या काळात बाजारात आणतील. एकूणच इंटरनेट, स्मार्टफोन यांनी जसे कोट्यवधी माणसांच्या सामाजिक / आर्थिक आयामांचे संदर्भ बदलले तसे काहीसे होऊ घातले आहे हे नक्की.

कॉर्पोरेट भांडवलशाही आपल्या नफ्याची पातळी वाढवण्यासाठी सतत नवनवीन प्रोडक्ट / सेवा बाजारात आणत असते आणि ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी चंगळवादाची सवय लावते अशी ठोकळेबाज विधाने सरार्स केली जातात. पुस्तकी वाक्ये फेकण्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही.

पण कोट्यवधी ग्राहक ती विकत का घेतात ,अगदी क्रांती झालेल्या कम्युनिस्ट पक्षाची एकहाती सत्ता असणाऱ्या देशात तसे प्रोडक्ट्स/सेवा का विकल्या जातात याची उत्तरे शोधली पाहिजेत.

आणि उत्तरे शोधताना लक्षात येते कि याचा संबंध फक्त नफा/चंगळवादाशी नाही ; तो आहे पण तोच एकमेव नाही. त्याचा संबंध उत्पादकतेशी देखील आहे , सेवांच्या सुधारित गुणवत्तेशी देखील आहे, माणसांच्या खऱ्या गरजांशी आणि आराम/आनंद शोधण्याच्या नैसर्गिक प्रेरणांशी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com