Maharashtra CM Fellowship 2025-26: महिना ६१ हजार देणारी पदवीधरांसाठी फेलोशिप; अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Fellowship for Students: महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप २०२५-२६ जाहीर केली असून, पदवीधरांना ६१,५०० रुपये मानधन मिळणार आहे. १२ महिन्यांच्या या फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार mahades.maharashtra.gov.in वर अर्ज करू शकतात.
Maharashtra CM Fellowship 2025-26
Maharashtra CM Fellowship 2025-26Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: पदवीधरांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप २०२५-२६ जाहीर झाली आहे. ही फेलोशिप १२ महिन्यांसाठी असणार आहे. निवड झालेल्या फेलोंना दरमहा ५६ हजार १०० रुपये मानधन आणि ५ हजार ४०० प्रवासखर्च मिळून एकूण ६१ हजार ५०० रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ साठी अर्ज प्रक्रिया गुरुवार (ता. ३) पासून सुरू करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित कार्यक्रमांतर्गत ६० पदवीधरांची निवड केली जाणार आहे. त्यापैकी एक तृतीयांश जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 

निवड झालेल्या फेलोंची राज्यातील २० निवडक जिल्ह्यांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. त्यातील काही फेलोंना जिल्हाधिकारी तर काहींना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार आहे. ही फेलोशिप १२ महिन्यांसाठी असणार आहे.  निवड झालेल्या फेलोंना दरमहा ५६ हजार १०० रुपये मानधन आणि ५ हजार ४०० प्रवासखर्च मिळून एकूण ६१ हजार ५०० रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात दिले जाणार आहेत. 

Maharashtra CM Fellowship 2025-26
Agricultural Fellowship Program : नारायणगाव येथील कृषी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना फेलोशिप

अर्ज कुठे करावा

इच्छुक उमेदवारांना mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. तसेच अधिक माहितीसाठी mahades.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.

पात्रता आणि निवड प्रक्रिया

फेलोशिपसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा, तसेच किमान ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. किमान १ वर्षाचा पूर्णवेळ अनुभव आवश्यक असून, स्वयंरोजगार किंवा इंटर्नशिपचाही अनुभव ग्राह्य धरला जाईल. उमेदवाराला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे तसेच संगणक आणि इंटरनेट हाताळणीचे ज्ञान आवश्यक असणार आहे.

Maharashtra CM Fellowship 2025-26
Maharashtra Education Policy : ‘सीबीएसई’चा आग्रह कशासाठी?

अर्जदाराची वयोमर्यादा २१ ते २६ वर्षे आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा (३० गुण), निबंध लेखन (२० गुण) आणि अंतिम मुलाखत (५० गुण) अशा एकूण १०० गुणांच्या आधारे होणार आहे. समान गुण मिळाल्यास महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

शैक्षणिक प्रशिक्षण आणि अटी-शर्ती

फेलोशिप अंतर्गत आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण विषयावर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवला जाईल. यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. फेलोंनी नियुक्त ठिकाणी नियमित फील्ड वर्क आणि शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक असेल. कामगिरी असमाधानकारक ठरल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता फेलोशिप समाप्त केली जाऊ शकते.

इतर महत्त्वाच्या अटी

- फेलोंनी शासकीय गोपनीयता पाळावी व कोणतीही माहिती अधिकृत परवानगीशिवाय उघड करू नये.

- राजकीय चळवळींमध्ये सहभाग घेता येणार नाही.

- पूर्णवेळ अभ्यासक्रम, खाजगी व्यवसाय किंवा इतर नोकरी करता येणार नाही.

- १२ महिन्यांच्या कालावधीत केवळ ८ दिवसांची सुट्टी मिळेल, त्यापेक्षा अधिक रजा घेतल्यास मानधन कपात केली जाईल.

- पोलीस पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी अनिवार्य असेल.

- नियुक्तीनंतर संगणकीय सुविधा दिली जाईल, मात्र फेलोशिप संपल्यावर ती परत करावी लागेल.

- अपघात विमा वित्त विभागाच्या नियमानुसार दिला जाईल, मात्र पेन्शन, महागाई भत्ता व इतर सेवाविषयक लाभ मिळणार नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com