
Nagpur News: राज्यात बांबू वाण तसेच उत्पादकता वाढ विषयक संशोधनाला चालना मिळावी याकरिता पहिल्यांदाच एमएससी (कृषी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावरील पहिल्या फेलोशिपचा मान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सहा विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथे राज्यस्तरीय बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून विविधस्तरावर संशोधन केले जाते. त्यासोबतच राज्यातील अनेकांना प्रशिक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अकोला कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयात प्रवेशीत एमएससीच्या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा लाख रुपयांची फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे.
बांबूतील नवे वाण त्यासोबतच बांबूची उत्पादकता वाढ या विषयावर संशोधनात्मक पातळीवर विद्यार्थ्यांना काम करावे लागणार आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. एस. एस. माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनात ही उपलब्धी साधता आली, असे डॉ. विजय इलोरकर यांनी सांगितले.
बांबू उत्पादकता, लागवड तंत्रज्ञान, कार्बन क्रेडीट, कीडरोग नियंत्रण, कापणीअंती बांबूचा टिकवण कालावधी वाढावा याकरिता त्यावर सेंद्रिय प्रक्रिया, बांबूपासून जनावरांसाठी चारा, गडचिरोलीतील पारंपरिक बांबू कारागिरांना प्रोत्साहन त्यासोबतच या कारागिरांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठीचे उपाय, अशा विविध स्तरावर संशोधनातून शिफारशी कराव्या लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात याअंतर्गत कृषीच्या सहा जणांना फेलोशिप मिळाली असून त्यातील चार वनशेती विभागाचे तर दोन इतर विद्याशाखेचे विद्यार्थी आहेत, असेही डॉ. इलोरकर यांनी सांगितले.
...अशी आहे फेलोशिप
तीन लाख रुपयांपैकी ५० टक्के रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल. उर्वरित ५० टक्के रक्कम ही कृषी विद्यापीठाच्या वनशेती विभागाला मिळणार आहे. त्याचा विनियोग संशोधनकामी लागणाऱ्या संसाधनाची उपलब्धता, पूरक साहित्य तसेच अभ्यास दौरा अशा बाबींवर केला जाणार असल्याची माहिती डॉ. विजय इलोरकर यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.