Agricultural Fellowship Program : नारायणगाव येथील कृषी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना फेलोशिप

Agricultural Education : परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन फेलोशिपअंतर्गत (पीपीसीएफ) ग्रामोन्नती मंडळ कृषी शिक्षण संकुलातील निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
Agricultural Fellowship
Agricultural Fellowship Agrowon
Published on
Updated on

Narayangaon News : परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन फेलोशिपअंतर्गत (पीपीसीएफ) ग्रामोन्नती मंडळ कृषी शिक्षण संकुलातील निवड झालेल्या आठ विद्यार्थ्यांची फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३५, हजार ४२० रुपयांची फेलोशिप उपास सोशियो कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून धनादेश विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकडे प्रदान करण्यात आले.

Agricultural Fellowship
Sharad Pawar Inspire Fellowship : ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’साठी करा अर्ज

या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित भाऊ खैरे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, कृषी शिक्षण संकुलाचे प्रमुख रत्नदीप भरवीरकर, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, प्रकल्प प्रमुख सविता जोहार आदी उपस्थित होते. यावेळी कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या माहिती पत्रिकेचेही अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.

Agricultural Fellowship
VIPM Fellowship : विस्तार संचालक भिकाने यांना फेलोशिप

कृषिरत्न मेहेर म्हणाले, की विद्यार्थ्यांनाही आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून पीपीसीएफ फाउंडेशनने नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी शिक्षण संकुलाची निवड केली. या बद्दल फाउंडेशनचे संचालक प्रमोद आणि परिमल चौधरी यांचे हार्दिक आभार.

भविष्यातही ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी आपण एकत्रित काम करू. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये या उद्देशाने या फाउंडेशनने मदत केल्याची जाणीव ठेवावी, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सूत्रसंचालन फेलोशिप प्रकल्पाच्या समन्वयक प्रतीक्षा अभंग भुजबळ यांनी केले. प्रा. राजश्री कवडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com