Maize Crop Management: मका पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Maize Cultivation: हवामान बदलाशी अनुकूल शेती काळाची गरज आहे. खादाड समजल्या जाणाऱ्या मका पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.
Agrowon Dialogue
Agrowon DialogueAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: हवामान बदलाशी अनुकूल शेती काळाची गरज आहे. खादाड समजल्या जाणाऱ्या मका पिकात अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

‘सकाळ ॲग्रोवन’ व ‘एचडीएफसी बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने परसोडा येथे वैजापूर येथे मंगळवारी (ता. २४) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘मका लागवड व्यवस्थापन’ विषयावर डॉ. पवार मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून एचडीएफसी बँकेचे वैजापूर शाखा व्यवस्थापक गणेश पवार यांच्यासह, सरपंच साहेबराव बारसे, राजूसिंह छानवाल, तंटामुक्ती अध्यक्ष सुदामसिंग छानवाल

Agrowon Dialogue
Maize Cultivation : बुलडाण्यात रब्बी हंगामासाठी मका ठरतोय शेतकऱ्यांचा आधार

तसेच प्रयोगशील शेतकरी नारायण कवडे, सहायक कृषी अधिकारी एस. बी. राजपूत, पाणी फाउंडेशनचे तालुका तांत्रिक प्रशिक्षक बाळासाहेब चव्हाण, गणेश सूर्यवंशी, कल्याणी ग्राम संघाच्या अध्यक्षा लक्ष्मी बारसे, उपजीविका सखी लता लालसरे, शेतकरी गटाच्या सुवर्ण शिंदे आदींची उपस्थिती होती.

डॉ. पवार म्हणाले, की कपाशीच्या पट्ट्यात मक्याचे क्षेत्र वाढण्याचे प्रमुख कारण कपाशीचा वाढलेला उत्पादन खर्च. मक्याचे क्षेत्र यंदा लक्षणीय वाढले आहे. मक्याचा एकरी उत्पादन खर्च सुमारे २५ हजारापर्यंत येतो. खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात मका उत्पादन घेतले जाते. हंगाम व बागायती किंवा जिरायती यानुसार लागवड करताना वाणाची निवड करणे आवश्यक आहे. लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

Agrowon Dialogue
Maize Cultivation: दरस्थिरतेमुळे मराठवाड्यात मका लागवड वाढणार

रासायनिक बीज प्रक्रियेबरोबरच जैविक बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे. उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ करते. कपाशी पिकात जसे अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे तसेच मका पिकातही अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने दिलेली खते पिकाकडून शोषली जात नाहीत. परिणामी उत्पादन कमी होते.

लागवडीच्या प्रचलित पद्धतीपेक्षा मक्याची लागवड गादीवाफ्यावर केल्यास उत्पादनात फायदा होतो. त्यामुळे मूलस्थानी जलसंधारणाचा प्रश्न मार्गी लागतो. सूक्ष्म सिंचनाचा वापर व माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. पवार यांनी, बँक शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. श्री. ठक्के यांनी, ‘ॲग्रोवन संवाद’ सारखा उपक्रम संवादातून समृद्धीकडे नेण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगितले.

शेती पद्धतीचे रूप बदलले आहे. आपल्या शेतीशी शासनाच्या धोरणांची सुसंगत जोड घालावी लागेल. वैजापूर तालुक्यात कपाशीच्या ऐवजी मका पिकाचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला आहे. या पिकामध्ये उत्पादकता वाढीचे तंत्र शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. व्यवस्थापनातील शास्त्रोक्त बाबी समजून घेतल्यास मका पिकात उत्पादन वाढ शक्य आहे.

शासनाच्या योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभाग सतत प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक ‘ॲग्रोवन’चे वितरण सहव्यवस्थापक अजित वाणी यांनी केले. आभार ॲग्रोवन प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ‘ॲग्रोवन’चे जिल्हा वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे यांच्यासह ‘सकाळ ॲग्रोवन’चे वितरक काकासाहेब कवडे, मथुरा सोनवणे, कल्पना कवडे, अनिता सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com