Maize Cultivation : बुलडाण्यात रब्बी हंगामासाठी मका ठरतोय शेतकऱ्यांचा आधार

Maize Farming : विदर्भात मक्याची सर्वाधिक लागवड बुलडाणा जिल्ह्यात होत असते. व्यवस्थापनातील सोयी, मागणी, बाजारपेठेची उपलब्धता, चांगले उत्पादन, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता अशा विविध कारणांनी मका लागवडीचा कल वाढला आहे.
Maize Cultivation
Maize Crop Agrowon
Published on
Updated on

Buldana News : मागील दोन-तीन हंगामापासून जिल्ह्यात मक्याचे पीक मोठ्या क्षेत्रावर लागवड होऊ लागले आहे. यंदाच्या रब्बीत तब्बल ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झालेली असून, जिल्ह्यात एकरी उत्पादकता अनेक जण ४० ते ५० क्विंटलपर्यंत मिळवू लागले आहे. कमी दिवसांत तयार होणारे हे पीक आता एक सक्षम पर्याय म्हणून पुन्हा पाय रोवत आहे.

विदर्भात मक्याची सर्वाधिक लागवड बुलडाणा जिल्ह्यात होत असते. व्यवस्थापनातील सोयी, मागणी, बाजारपेठेची उपलब्धता, चांगले उत्पादन, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता अशा विविध कारणांनी मका लागवडीचा कल वाढला आहे.

Maize Cultivation
Maize Army Worm : खानदेशात मका पिकात लष्करी अळीचा प्रकोप कायम

यंदा रब्बीत सर्वाधिक ३१ हजार १७३ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक मका लागवड मोताळा, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांमध्ये होत आहे. यंदा मोताळ्यातील शेतकऱ्यांनी ७२३१ हेक्टरवर पेरणी केली. यंदा पीक जोमदार असून काही शेतकऱ्यांनी काढणी सुरू केली. यातील काही शेतकऱ्यांनी एकरी ४५ ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवले आहे.

Maize Cultivation
Maize Processing : विविध प्रक्रिया उद्योगात मक्याची उपयुक्तता

यंदाची तालुकानिहाय लागवड (हेक्टरमध्ये)

जळगाव जामोद लागवड १९४५ (सरासरी ६०७), संग्रामपूर १२३० (१०६०), चिखली १९४६ (१११७), बुलडाणा ३८६८ (२६५९), देऊळगावराजा १८५० (११७६), मेहकर ५२७ (१९५), सिंदखेडराजा ५२४ (५७९), लोणार १४१० (२३८), खामगाव ३६७० (५३६), शेगाव ३५, मलकापूर ४४४५ (१२३३), मोताळा ७२३१ (१२७१) आणि नांदुरा तालुक्यात ३७२५ (८५६)

लागवड वाढण्याची कारणे

- मका पिकात तणनाशकाचा वापर करणे सोयीचे.

- जमीन मध्यम-भारी असल्याने पिकाला पोषक.

- इथेनॉलमध्ये मका वापराला मान्यता मिळाल्याने सातत्याने मागणी.

- कमी दिवसांत येणारे पीक.

- हेक्टरी उत्पादकता ३२ क्विंटल.

- अनेक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन ४५ ते ५० क्विंटलपर्यंत.

- अधिक उत्पादकता देणाऱ्या वाणांची उपलब्धता वाढली.

- चाऱ्याची उपलब्धता वाढते.

जिल्ह्याची लागवड

सरासरी ११७८१

प्रत्यक्ष लागवड- ३११७३ हेक्टर

टक्केवारी-२६४

यंदा मी अडीच एकरात लागवड केली आहे. पीक अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. महिनाभरात काढणी करावी लागेल. आमच्या भागात काही शेतकऱ्यांनी मक्याची मळणी केली असून एकरी ४५ ते ५० क्विंटल उत्पादन मिळवले आहे.
मका अल्प कालावधीचे पीक आहे. जिल्ह्यात नांदुरा, मलकापूर सारख्या चांगल्या बाजारपेठा आहेत. पोल्ट्री व इतर क्षेत्रात मक्याची मागणी आहे. जितके उत्पादन होते ते सर्व विक्री होण्याची शाश्‍वती आहे. पीक बदलाला हे पीक चांगला पर्याय मिळाला आहे. साठवणुकीची गरज भासत नाही. जनावरांसाठी चाऱ्याचीही उपलब्धता होत असल्याने मका पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच यंदा ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड होऊ शकली.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्याचे वातावरण या पिकासाठी पोषक असून भारी व मध्यम जमीन लागवडीस योग्य आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही मका लागवडीकडे कल वाढला आहे. आपली हेक्टरी उत्पादकता सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ३२ क्विंटल एवढी आहे. बरेच शेतकरी एकरी यापेक्षा अधिक उत्पादन काढत आहेत.
- डॉ. दिनेश कानवडे, प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, पंदेकृवि, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com