Maize Cultivation: दरस्थिरतेमुळे मराठवाड्यात मका लागवड वाढणार

Kharif Sowing 2025: मराठवाड्यात खरिपात मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मका लागवडीची शक्यता आहे.
Maize Plantation
Maize PlantationAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यात खरिपात मका पिकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मका लागवडीची शक्यता आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मकाचे सुमारे ९९९० क्विंटल बियाणे विकल्या गेले आहे. बाजारपेठ व दरातील सातत्याने मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

Maize Plantation
Maize Cultivation : बुलडाण्यात रब्बी हंगामासाठी मका ठरतोय शेतकऱ्यांचा आधार

खरीप हंगामासाठी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत मका पिकाचे सुमारे २ लाख ६९ हजार ६२१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ५६१ हेक्टर, जालन्यातील ३९ हजार ८६० हेक्टर तर बीडमधील ७२०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Maize Plantation
Maize Market: अमेरिकन ज्वारीची पशुखाद्यासाठी मागणी

गतवर्षी खरिपात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली होती. यंदा आर्द्रता व खरेदीचे नियम पाळणाऱ्या शेतकऱ्यांना २१०० ते २२५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत मक्याचा दर मिळाला. तो दर सातत्याने मेपर्यंत टिकून होता आणि आहे.

आधी कपाशीला पर्याय सोयाबीन शोधणारे शेतकरी आता मका पिकालाही पसंती देत आहेत. दरातील सातत्य हे त्यातील प्रमुख कारण आहे.
पी. आर. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
आमच्या शिवारात यंदा ४० टक्के क्षेत्रावर मका, तर इतर ६० टक्के क्षेत्रावर कपाशी आणि सोयाबीनचे पीक असेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा किमान १५ टक्के क्षेत्रवाढ होईल. सोयाबीन, कपाशीपेक्षा मक्याला शेतकऱ्यांची पसंती आहे. दर आणि बाजारपेठ हे त्यातील प्रमुख कारण आहे.
भिकनराव वराडे, नळणी, ता. भोकरदन, जि. जालना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com