Online Gambling: ग्रामीण महाराष्ट्र जुगाराच्या विळख्यात

Rural Youth Gambling Addiction: ग्रामीण महाराष्ट्रात स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सुलभतेमुळे ऑनलाइन जुगाराचा शिरकाव झपाट्याने वाढत आहे. तरुण पिढी झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासात जुगार व अतिजोखमीच्या ट्रेडिंगमध्ये अडकत असून, यामुळे आर्थिक, मानसिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Online Gambling
Online GamblingAgrowon
Published on
Updated on

अमोल साळे

Mental Health And Gambling : संतोष, एका खेडेगावातील आयटीआय पदवीधर, छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीमध्ये नोकरीला लागला. मेहनतीने त्याने प्रगती केली, कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले. त्याने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले, काही वर्षांतच तो नोकरीत कायम झाला, पगारही चांगला वाढला. अल्पभूधारक, दुष्काळग्रस्त शेतकरी आई-वडिलांसाठी आपला मुलगा संतोष स्थिरस्थावर होताना पाहणे, हे जणू आभाळ ठेंगणे होण्यासारखेच होते.

पण एक दिवस तो चक्री या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनात अडकला. सुरुवातीला जिंकला, नंतर हरू लागला, कर्जबाजारी झाला. घर, दागिने गहाण पडले, घरातील शांतता भंग पावली. सामाजिक प्रतिष्ठा गेली. आर्थिक आणि मानसिक तणावामुळे तो दारूच्या आहारी गेला. आज त्याची पत्नी घर चालविण्यासाठी काम करते आहे, मुलांची फी थकली आहे. संतोषला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. संतोषचे हे उदाहरण प्रातिनिधिक आहे; आपल्या आजूबाजूला असे अनेक संतोष नकळतपणे या विनाशकारी चक्रात अडकत आहेत.

Online Gambling
Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पावरून उध्दव ठाकरेंनी महायुतीवर डागली तोफ ; म्हणाले, 'महाराष्ट्र केला कर्जबाजारी..'

जगात जुगार फार जुना आहे, अगदी महाभारतातही त्याचा उल्लेख आहे जिथे युधिष्ठिर द्युतात सर्वस्व गमावतो. ऋग्वेदातही जुगाराच्या व्यसनाचे वर्णन आहे. कालांतराने जुगाराचे स्वरूप बदलले असले तरी त्याची ओढ आणि व्यसन अजूनही तीव्र आहे. वैदिक काळापासून ते आजच्या ऑनलाइन युगापर्यंत, जुगारामुळे सर्वस्व गमावण्याच्या घटना सारख्याच आहेत.

हा खेळ नसून, व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर खोलवर परिणाम करणारा हानिकारक व्यवहार आहे. आज जुगाराचे व्यसन ही गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. आर्थिक अस्थिरता, रोजगाराची चिंता आणि सहज उपलब्ध असलेल्या डिजिटल माध्यमांमुळे झटपट पैसे कमवण्याच्या आशेने लोक जुगाराकडे वळतात. तरुण, तसेच कमी उत्पन्न असलेले आणि मानसिक तणावात असलेले लोक याला सहज बळी पडतात.

Online Gambling
APMC Market Income : बाजार समित्यांचे सेस उत्पन्न ५० टक्क्यांनी होणार कमी

कायदेशीर जुगार

आधुनिक भारतात कायदेशीर जुगार मर्यादित आहे. काही राज्यांत लॉटरी, घोड्यांच्या शर्यती, रमी व कॅसिनो आहेत. परंतु अवैध जुगाराचा मोठा बाजार असून क्रिकेटवर मोठा सट्टा लावला जातो. पूर्वी जुगार अड्ड्यावर जायला लागायचे, आता मोबाईल व इंटरनेटमुळे घरात बसून जुगार खेळता येतो, त्यामुळे अवैध जुगाराची व्याप्ती व धोका वाढला आहे. भारतात ऑनलाइन जुगारावर कायदेशीर स्पष्टता नाही, ज्याचा अनेक प्लॅटफॉर्म फायदा घेतात.

‘कौशल्याचा खेळ’ विरुद्ध ‘नशिबाचा खेळ’ या वादाचा वापर करून, अनेक ॲप्स फँटसी स्पोर्ट्सच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन देतात. ड्रीम११ सारखे ॲप्स लोकप्रिय आहेत, पण ते प्रवेश शुल्क घेतात, तसेच त्यामुळे व्यसन लागू शकते. क्रिकेट स्पर्धांच्या वेळी या खेळांची लोकप्रियता वाढते, अनेक सेलिब्रिटी त्यांचा प्रचार करतात. ‘कौशल्याचा खेळ’ म्हणत असले, तरी यात नशिबाचा भाग जास्त असतो आणि ते आर्थिक, मानसिक नुकसान करू शकतात.

ग्रामीण भागात शिरकाव

फँटसी स्पोर्ट्सच्या पलीकडे जाऊन, आजकाल अनेक साधे पण तितकेच धोकादायक जुगाराचे ॲप्स आपल्या ग्रामीण भागातील तरुणाईला लक्ष्य करत आहेत. स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटमुळे हे ॲप्स थेट प्रत्येकाच्या हातात पोहोचले आहेत. यात ‘चक्री’ नावाचा एक खेळ (जिथे एका फिरणाऱ्या चक्रावर पैसे लावले जातात आणि नशिबावर हार-जीत ठरते), ‘एव्हिएटर’ (Aviator) सारखे क्रॅश गेम्स (जिथे एक वाढणारा आलेख अचानक कधी ‘क्रॅश’ होईल यावर पैसे लावले जातात आणि तो क्रॅश व्हायच्या आधी पैसे काढायचे असतात.

Online Gambling
Grape Farming Management : द्राक्ष बागेत संजीवकाचा समंजसपणे वापर आवश्यक

हा खेळ अत्यंत वेगाने व्यसन लावतो), तसेच पारंपरिक वाटणारे, पण पैशांची बाजी लावून खेळले जाणारे रमी, तीन पत्ती आणि लुडो यांसारख्या खेळांचे ऑनलाइन स्वरूप यांचा समावेश आहे. हे खेळ दिसायला साधे आणि आकर्षक असले, तरी त्यांच्या व्यसनाधीनतेची क्षमता खूप जास्त आहे.यातील बहुतेक ॲप्सची रचना अशी असते की सुरुवातीला अगदी कमी पैशात (उदा. १०-२० रुपये) खेळता येते.

कधी कधी मुद्दामहून सुरुवातीला काही डाव जिंकायलाही दिले जातात, ज्यामुळे खेळणाऱ्याचा आत्मविश्‍वास वाढतो आणि त्याला ‘आपण सहज जिंकू शकतो’ असा भ्रम निर्माण होतो. पण हळूहळू तो अधिक पैसे लावायला लागतो आणि नुकसानीच्या चक्रात अडकतो. ग्रामीण भागातील तरुण, ज्यांच्याकडे मर्यादित उत्पन्न असते किंवा जे शेतीवर अवलंबून असतात, ते अशा झटपट पैशाच्या मोहाला सहज बळी पडतात. त्यांच्यासाठी याचे परिणाम अधिक गंभीर असतात.

Online Gambling
7/12 Online : शेतजमिनीच्या सातबारावर कोण-कोणत्या गोष्टींची नोंद असते?

शेतीतून मिळालेले किंवा इतर कामातून कमावलेले थोडेफार पैसे या ॲप्समध्ये गमावले जातात. पैसे संपले की उसनवारी आणि प्रसंगी घरातील वस्तू, दागिने गहाण ठेवण्याची किंवा विकण्याची वेळ येते. काही जण तर स्थानिक सावकारांकडून मोठ्या व्याजाने कर्ज घेतात आणि कर्जाच्या कधीही न फिटणाऱ्या विळख्यात अडकतात. याचा थेट परिणाम त्यांच्या शेतीच्या कामांवर, मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या रोजच्या गरजांवर होतो. हे खेळ इतके आकर्षक असतात की तरुण मुले त्यात तासन् तास गुंतून राहतात.

शेतीची कामे, शिक्षण किंवा इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांचे भविष्य अंधारात ढकलले जाते. सतत पैसे हरल्यामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो, चिडचिड वाढते, नैराश्य येते. घरात रोज भांडणं होतात, नात्यांमध्ये कटुता येते आणि कुटुंबाची शांतता भंग पावते.काही टोकाच्या प्रकरणांमध्ये आत्महत्येसारखे विचारही मनात येऊ लागतात. गावात किंवा समाजात ‘जुगारी’ म्हणून ओळख निर्माण झाल्यास सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. लोक विश्‍वासाने वागत नाहीत.थोडक्यात, हे वरवर सोपे आणि आकर्षक वाटणारे जुगारी ॲप्स ग्रामीण भागातील तरुणाईला आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत करत आहेत. त्यांची सहज उपलब्धता आणि आक्रमक जाहिरातबाजी यामुळे हा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंग

जुगार आणि बेटिंगच्या बरोबरच, आर्थिक जगात आणखी एक क्षेत्र सर्वसामान्यांच्या, विशेषतः तरुण पिढीच्या, आकर्षणाचे केंद्र बनले आहे, ते म्हणजे शेअर मार्केट ट्रेडिंग. येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक (Long-term Investment) आणि शेअर मार्केट ट्रेडिंग (Share Market Trading) या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. गुंतवणूक ही विचारपूर्वक, अभ्यास करून, चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घ काळासाठी पैसे लावणे असते, तर ट्रेडिंग हे अनेकदा कमी कालावधीत किमतीतील फरकाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न असतो.

Online Gambling
Stock Market : शेअर मार्केटची झिंग

त्यात धोका अधिक असतो. ट्रेडिंगमध्ये, विशेषतः फ्यूचर्स अँड ऑप्शन्समध्ये (F&O), कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवले जाते, परंतु धोकाही खूप आहे. SEBI अहवालानुसार, ९० टक्क्यांपेक्षा जास्त वैयक्तिक ट्रेडर्स इक्विटी F&O मध्ये पैसे गमावतात. २०२२ ते २०२४ मध्ये, १ कोटी १३ लाख लोकांनी १ लाख ८१ हजार कोटी रुपये गमावले. सरासरी नुकसान १ लाख २० हजार रुपये झाले आणि फक्त १ टक्का लोकांना १ लाखापेक्षा जास्त नफा झाला.

चिंताजनक बाब म्हणजे, F&O मध्ये व्यवहार करणाऱ्या तरुण आणि कमी उत्पन्न गटात तोटा जास्त प्रमाणात आहे. २०२४ मध्ये ४३ टक्के ट्रेडर्स ३० वर्षांखालील होते आणि ९३ टक्के तरुण ट्रेडर्सना तोटा झाला. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त F&O ट्रेडर्स हे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असलेले होते. या गटातील ९२.२ टक्क्यांलोकांना तोटा झाला. तोटा होत असूनही व्यवहार सुरूच राहतात. सलग दोन वर्षे तोटा झालेल्यांपैकी ७५ टक्के ट्रेडर्सनी तिसऱ्या वर्षीही ट्रेडिंग सुरू ठेवले. हे आकडे जुगाराच्या व्यसनासारखेच आर्थिक नुकसान दर्शवतात. ‘मोहाचे मानसशास्त्र’ आणि ‘तत्काळ समाधानाचा हव्यास’ यामुळे हे घडते. ‘गॅम्बलर्स फॅलसी’मुळे सलग तोट्यानंतरही नफ्याची आशा ठेवली जाते.

अनेकदा, सुरुवातीला थोडं नुकसान झाल्यावर ते भरून काढण्याच्या नादात माणसं आणखी पैसे लावतात. याला ‘नुकसान टाळण्याची प्रवृत्ती’ (Loss Aversion) म्हणतात, जिथे नफा मिळवण्यापेक्षा नुकसान टाळण्याची इच्छा अधिक तीव्र असते. याच विचारातून ‘संक कॉस्ट फॅलसी’ (Sunk Cost Fallacy) जन्माला येते. याचा अर्थ, ‘आतापर्यंत एवढे गेलेच आहेत, थोडे आणखी लावून बघू, कदाचित नशीब बदलेल,’ असा विचार करून ते आधीच गुंतवलेले पैसे वाया जाऊ नयेत म्हणून आणखी पैसे गुंतवतात, जरी पुढे नुकसानच दिसत असले तरी.

Online Gambling
Onion Production Cost : कांदा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः डॉ. गायकवाड

यासोबतच, काही लोकांना ‘नियंत्रणाचा भ्रम’ (Illusion of Control) असतो. त्यांना वाटतं की त्यांच्याकडे काहीतरी खास ‘सिस्टीम’ किंवा ‘कौशल्य’ आहे, ज्यामुळे ते बाजाराचा किंवा खेळाचा निकाल अगदी बरोबर ओळखू शकतात. (खरं तर वास्तव वेगळं असतं.) पण हा विचार अनेकदा मूलभूत विश्‍लेषण किंवा बाजाराच्या वास्तविक स्थितीवर आधारित नसून, केवळ एका भावनिक किंवा चुकीच्या तर्कावर आधारलेला असतो; ज्यामुळे ते नुकसानीच्या मालिकेत अधिक खोलवर ओढले जातात.

शेअर बाजाराचे अचूक भविष्य वर्तवणे अशक्य आहे. तज्ज्ञांचे अंदाज केवळ शक्यतांवर आधारित असतात. अनेकदा ते निरुपयोगी ठरतात. नशीब आणि कौशल्य यात फरक करणे महत्त्वाचे. ‘बिगिनर्स लक’मुळे अवाजवी आत्मविश्‍वास निर्माण होतो. सोशल मीडियावरील खोट्या यशोगाथांमुळे कळपाची मानसिकता वाढते. त्यामुळे मोठ्या जोखमी घेण्याची प्रवृत्ती वाढते व नशिबाची साथ संपल्यावर मोठे नुकसान होते. खरा अनुभव व कौशल्य हे दीर्घकाळ, चढ-उतार पाहून व अभ्यास करूनच विकसित होते.

जसे जुगारात ‘हाउस’ (म्हणजे जुगार चालवणारी संस्था) नेहमी जिंकतो, तसेच शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ब्रोकरेज हाउस, एक्स्चेंजेस आणि सरकार यांना फायदा होतो. जुगाराच्या नियमांमुळे ‘हाउस’ नफ्यात राहतो, तसेच शेअर बाजारात फ्यूचर्स अँड ऑप्शन्समध्ये प्रत्येक व्यवहारातून ब्रोकरेज कंपन्या आणि एक्स्चेंजेस कमाई करतात. तीन वर्षांत वैयक्तिक ट्रेडर्सनी ५०,००० कोटी रुपये व्यवहार शुल्क भरले. व्यवहारांची संख्या जास्त तेवढी मध्यस्थांची कमाई जास्त, जरी ९० टक्के सामान्य लोक पैसे गमावत असले तरी. सरकारलाही यातून महसूल मिळतो.

Online Gambling
Stock Market : शेवगाव तालुक्यात शेअर बाजाराचा विळखा

सेबीने वेळोवेळी गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यासाठी आणि F&O ट्रेडिंगमधील धोक्यांची जाणीव करून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. परंतु सेबीच्या इशाऱ्यांनंतरही F&O मधील रिटेल ट्रेडर्सचा सहभाग आणि नुकसानीचे प्रमाण कमी होत नाही. केवळ सूचना किंवा मर्यादित जनजागृती पुरेशी नाही. शेअर मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी अधिक कठोर आणि परिणामकारक उपाययोजना, तसेच व्यापक जनजागृती मोहिमांची गरज आहे.

विदेशी वेबसाइट्स व ॲप्लिकेशन्स

अनेक विदेशी जुगार वेबसाइट्स व ॲप्लिकेशन्स भारतीय लोकांना लक्ष्य करतात आणि कायद्याच्या कचाट्यात न सापडता सहजपणे पैसे कमावतात. टॅक्स हेव्हनमधून चालवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जाते. ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांवर थेट कारवाई होत नसली तरी अड्डे चालवणाऱ्यांवर कारवाईचा प्रयत्न होतो. यूपीआय/ई-वॉलेट्समुळे पैसे भरणे-काढणे सोपे झाल्याने मनी लॉन्ड्रिंग व कर चुकवेगिरी होते. बंदी घातली तरी नवीन नावाने असे प्लॅटफॉर्म पुन्हा येतात.

हे ॲप्स वापरकर्त्याला अधिकाधिक वेळ गुंतवून ठेवतात व क्षणिक आनंदाची भावना निर्माण करतात. लहान बक्षिसे, ऑफर्स, सवलती किंवा फसवे संदेश (डार्क पॅटर्न्स) दाखवून डोपामिनद्वारे आनंद देतात. खरं तर यशासाठी आणि श्रीमंतीसाठी शॉर्टकट नाही. जुगार आणि बेटिंग कंपन्या कमी कष्टात मोठे यश मिळविण्याचे खोटे प्रलोभन देतात. तरुणांनी मोबाइल वापराचे नियंत्रण ठेवणे आणि अशा प्रलोभनांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. झटपट श्रीमंत होण्याची लालसा तरुणांना ऑनलाइन जुगाराच्या जाळ्यात अडकवते आहे.

मानसिक आरोग्यावर परिणाम

जुगाराचे व्यसन आणि अति जोखमीचे शेअर मार्केट ट्रेडिंग मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. ऑनलाइन गेमिंग, फँटसी स्पोर्ट्समुळे तरुणांमध्ये मानसिक समस्या वाढल्या आहेत. अनेक कुटुंबं आर्थिक नुकसान, कर्जबाजारीपणा आणि तणावामुळे उद्‍ध्वस्त झाली आहेत. ऑनलाइन गेमिंग व शेअर बाजारातील आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या झाल्याची प्रकरणे नोंदविली गेली आहेत.

व्यसनग्रस्तांसाठी समुपदेशन व उपचार सुविधा आणि प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत. क्षणिक मोहापायी जुगार किंवा अति जोखमीच्या शेअर मार्केट ट्रेडिंगकडे वळण्याऐवजी कौशल्ये विकसित करणे श्रेयस्कर आहे. जुगाराचे व्यसन गंभीर असून, त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार महत्त्वाचे आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये व्यसनमुक्ती उपचार उपलब्ध असून, गरज वाटल्यास मोफत समुपदेशन आणि मदत घेता येईल. स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक गटही याकामी मदत करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com