Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पावरून उध्दव ठाकरेंनी महायुतीवर डागली तोफ ; म्हणाले, 'महाराष्ट्र केला कर्जबाजारी..'

Udhhav Thackeray On Budget : 'मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे.
Published on

Pune News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प मंगळवारी (ता.१०) विधिमंडळात सादर केला. सलग ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवार यांना मिळाला आहे.

दरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 'मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेतकरी वर्ग आणि विशेषत: लाडक्या बहिणींना मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना उध्दव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र खड्ड्यात घालायचा प्रयत्न सुरू आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Budget 2025: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील महत्वाच्या १० घोषणा; कर्जमाफी, भावांतर, नमोच्या निधीत वाढ, शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं?

भाजपच्या संकल्प पत्रातील एक तरी संकल्प अर्थसंकल्पात मांडला का? हे संकल्प कधी होणार? २०५० साली पूर्ण करणार का? मग याला या वर्षीचा अर्थसंकल्प म्हणता येणार नाही. अशा शब्दात ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत टीका केली.

पुढे ठाकरे म्हणाले की, जी कामे नव्याने करणारे आहेत, ती उद्या-परवा करू, अशा पध्दतीचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत बोगस असा अर्थसंकल्प आहे. एक रुपयात पीकविमा योजना बंद पडली. या सर्व घोटाळ्याच्या योजना आहेत. सहकारी साखर कारखाने यांच्या बगलबच्च्यांचे आहेत. या कारखान्यांची थकहमी बंद केली होती. कारण ती लूट आहे. शेतकऱ्यांना थकहमी देत नाही. महापालिकेची थकहमी कधी देणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray
Gharkool Yojana Budget 2025 : घरकुल योजनेच्या निधीत वाढ; अजित पवारांकडून गृहनिर्माण धोरण जाहीर

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. 'मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी' ही जनतेची फसवणूक आहे. लोकांची आश्वासने पूर्ण करा, असेही ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, या सरकारचे लक्ष लाडक्या बहिणींवक नसून लाडक्या कंत्राटदारांकडे आहे. त्यांची लाडके कंत्राटदार योजना आहे. त्यांनी अर्थसंकल्प गिळला आहे, अशा कडवट शब्दात ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना महायुती सरकारवर तोफ डागली आहे. .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com