Agriculture App : स्मार्ट शेतीसाठी कोणकोणते ॲप्स आहेत महत्त्वाची?

Indian Agriculture : बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल फोन आहे. त्यांचा वापरही संपर्क, संवादासह विविध कारणांसाठी केला जातो. या मोबाइलमध्ये शेती उपयोगी असे वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करून वापरता येतात.
Agriculture App
Agriculture AppAgrowon
Published on
Updated on

एस. एस. होलमुखे

Agri App Update : बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाइल फोन आहे. त्यांचा वापरही संपर्क, संवादासह विविध कारणांसाठी केला जातो. या मोबाइलमध्ये शेती उपयोगी असे वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करून वापरता येतात.

शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले ॲप्स हे सामान्यतः स्थानिक भाषेसह हिंदी, इंग्रजीमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांचा सर्वांना सहजपणे वापर करता येतो. अशा ॲप्सद्वारे शेती पद्धती, यंत्रसामग्री, बाजारभाव, पेरणीची परिस्थिती अशा प्रकारे अनेक माहिती मिळू शकते. बहुतांश ॲपही मोफत डाउनलोड करता येतात.

पुसा कृषी

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक परतावा मिळविण्यासाठी कृषी पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणणे हे या ॲपचे उद्दिष्ट आहे. त्याद्वारे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे (IRAI) विकसित केलेल्या नवीनतम तंत्रज्ञानांची माहिती उपलब्ध होते.

Agriculture App
Borewell Water Level Measurement App : बोअरवेलची पाणी पातळी मोजणं झालं सोपं, अ‍ॅपच्या माध्यमातून घेता येणार नेमका अंदाज

eNAM मोबाइल ॲप

नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (NAM) हे संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक कृषी व्यापार विषयक संकेतस्थळ (ट्रेडिंग पोर्टल) आहे. त्याद्वारे भारत सरकारद्वारे सध्या देशभरातील मंडई, बाजार समिती यांच्या एकत्रित अशा नेटवर्कमधून एकीकृत राष्ट्रीय बाजारपेठ तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या ॲपचा उद्देश दूरस्थ बोली लावणे सुलभ करण्याचा आहे. व्यापारी आणि शेतकरी व अन्य भागधारकांना आवक आणि किमतीशी संबंधित माहिती उपलब्ध केली जाते. ‘ई-एनएएम’ मोबाइल ॲप v१.० हे मर्यादित वैशिष्ट्यांसह बिडिंगद्वारे जारी केले आहे. आपल्या शेतीमालाचे देशभरातील बाजारांमध्ये काय दर आहेत, याचा अंदाज शेतकऱ्यांना घेता येतो.

एस. एस. होलमुखे, ७३८७५२२२३४, आचार्य पदवी विद्यार्थी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲप्स डाउनलोड करण्यापूर्वी...

बाजारात वेगवेगळे ॲप्स असले, तरी त्यातील आपल्या कामाचे नेमके कोणते, हे पाहून तपासून, पारखून डाउनलोड करावेत. अनेक ॲप्स हे शेतकऱ्यांना कृषिविषयक बातम्या, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, सरकारी योजना यांची योग्य आणि खात्रीशीर माहिती देतात.

उदा. ‘ॲग्रोवन’ ॲप. मात्र काही ॲप हे कंपन्यांनी स्वतःची उत्पादने पोहोचविण्यासाठी विकसित केलेली असतात. तर काही त्रयस्थ, मध्यस्थांनी विकसित केलेली असतात. हे नीट जाणून घेऊन त्यानुसार त्यातील माहितीचा योग्य तारतम्याने वापर करावा. अन्यथा, फसवणूक होण्याचीही शक्यता असते. काही खासगी माहिती चोरी होण्याची शक्यता असते.

टीप : अत्याधुनिक तंत्रज्ञान या डॉ. सुनील गोरंटीवार लिखित लेखमालेचा भाग आज प्रकाशित होऊ शकला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com