Automated Weather Systems: स्वयंचलित हवामान यंत्रांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करा

Weather Prediction Technology: स्वयंचलित हवामान यंत्रांची अचूकता व विश्वासार्हता टिकवण्यासाठी तज्ज्ञांमार्फत तपासणी अनिवार्य आहे. योग्य देखरेख केल्यास हवामान अंदाज अधिक विश्वासार्ह ठरू शकतो.
Inspection Demand for Automatic Climate Control Systems
Inspection Demand for Automatic Climate Control SystemsAgrowon
Published on
Updated on

Nanded News: नांदेड जिल्ह्यात स्वयंचलित हवामान यंत्रांच्या तपासणीत अनेक यंत्रे सदोष आढळली होती. यामुळे बागायती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान यंत्रांची तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड, भोकर व नांदेड तालुक्यांसह जिल्ह्याच्या इतर भागांत बागायती केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

केळी पिकासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागते. परंतु सध्या मागील काही वर्षांपासून हवामानातील प्रतिकूल बदलामुळे केळीला गारपीट, अति उष्णता, अतिथंडी, वादळीवारे या संकटाचा फटका बसत आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक उद्‍ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

Inspection Demand for Automatic Climate Control Systems
Climate Change : नांदेडला सकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचे चटके

या सर्व संकटापासून आर्थिक संरक्षण मिळावे याकरिता केळी उत्पादक शेतकरी हवामान आधारित पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवितात. पीकविमा योजनेमध्ये, स्वयंचलित हवामान यंत्रांच्या हवामानाच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांना पीकविमा परतावा ठरत असतो. या नोंदी अचूकपणे घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Inspection Demand for Automatic Climate Control Systems
Banana Farming Techniques: केळी बागेचे व्यवस्थापन कसे करावे? जळगावातील शेतकऱ्याची यशोगाथा!

यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या स्वयंचलित हवामान यंत्रांच्या तपासणीत अनेक यंत्रे सदोष आढळली होती. त्यामुळे त्या वेळी बागायती केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची कुठलाच लाभ झाला नव्हता.

ही बाब लक्षात घेता बागायती केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची तीव्रता या विषयावर तातडीची बैठक आयोजित करून नांदेड जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान यंत्रांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमंत राजेगोरे, किशनराव कदम, तालुकाध्यक्ष बालाजी कल्याणकर, युवा आघाडीचे नरहरी पोपळे, माणिक राजेगोरे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com