Climate Change : नांदेडला सकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचे चटके

Summer Heat : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यामुळे दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत.
Papaya Cultivation
Climate Change Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यामुळे दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. परंतु किमान तापमान मात्र १५ ते १६ अंशांवर असल्यामुळे सकाळी थंडी जाणवत आहे. अशा वितरित वातावरणात शेतकऱ्यांना शेतीकामांना सामोरे जावे लागत आहे.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे जातो. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा जाणवायला सुरुवात होते. यंदाही एक फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६.९ नोंदले गेले.

Papaya Cultivation
Onion Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश

यानंतरच्या २५ दिवसात तापमानाचा पारा कमाल ३५.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला. परंतु किमान तापमान मात्र १५ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले गेले. मध्यतंरी किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमान मा़त्र ३५.२ नोंदले गेले. या काळात सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचे चटके बसू लागले. आजही जिल्ह्यात थंड-उष्ण वातावरण आहे.

या बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानाचा फटका जिल्ह्यातील केळी, फळपिके तसेच भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुपारी उन्हाचे चटके बसत असल्यामुळे गहू कापणी, हरभरा काढणी, ज्वारी काढणी या शेतीकामावर परिणाम दिसून येत आहे.

Papaya Cultivation
Vegetable Crop Damage: भाजीपाला, फळ पिकांना उन्हाचा फटका

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, टरबूज, खरबूज, पपई, मिरची आदी पिकांची लागवड केली आहे. या पिकांनाही वाढत्या तापमानाची झळ बसत आहे. सध्या उन्हाचे चटके वाढल्याने तापमान वाढीमुळे जिल्ह्याच्या प्रकल्पातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यात सध्या ३९८.१७ दशलक्ष घणमीटरनुसार ५४.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान वाढीचा फटका शेतीकामासह दुधाळ जनावरांनाही बसत आहे. दुपारच्या उष्णतेमुळे दुधाचे उत्पादन घटले आहे. यासोबतच चाऱ्याचाही मागणी वाढली आहे.

सकाळी गारवा तर दुपारी उन्हाचे चटके, अशा विपरीत वातावरणाचा केळीला फटका बसत आहे. यामुळे केळीच्या वाढीवर परिणाम दिसून येत आहे.
- रमेश मुंगल, शेतकरी, इजळी, ता. मुदखेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com