Devendra Fadnavis: पाकव्याप्त काश्मीरसारखी काँग्रेस पाकव्याप्त झाली

Parbhani Rally: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील जयघोष सभेत काँग्रेसवर घणाघात केला. सौर ऊर्जा, व्हॉट्सॲप सेवा व अॅग्रो क्लस्टरसह अनेक विकास घोषणा करण्यात आल्या.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. परंतु त्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे लोक देशात आहेत. काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरसारखी काँग्रेस पाकव्याप्त झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर गुरुवारी (ता. २९) आयोजित जयघोष सभेत फडणवीस बोलत होते. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार अजित गोपछेडे, आमदार संजय केणीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शिवाजी भरोसे आदी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: सिंचन प्रकल्प आणि पोकरा योजना विदर्भाचा चेहरा बदलणार?

श्री. फडणवीस म्हणाले, की शेतकऱ्यांना वीज मोफत दिली. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर पुढची २५ वर्षे शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाचे १२ तास मोफत वीज मिळेल. नवीन सरकार आल्यानंतर १०० दिवसांच्या कार्यक्रमात ९०० मुद्दे दिले त्यापैकी ७५० मुद्द्यांवर काम पूर्ण झाले. आता १५० दिवसांचा कार्यक्रम दिला. त्यात जनकेंद्रित व्यवस्था तयार करायची आहे.

CM Devendra Fadnavis
Agriculture Innovation: प्रत्येक पिकाची ‘इंडस्ट्री’ उभी करणे आवश्यक

सामान्य व्यक्तीला न्याय तसेच भ्रष्टाचार मुक्त प्रशासन मिळाले पाहिजे. राज्य शासनाच्या बाराशे सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था उभी करत आहोत. पारदर्शी, लोकाभिमुख, गतिशील प्रशासन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मेघना बोर्डीकर यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यमंत्री केले पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. परभणी जिल्ह्यात शेतीमाल प्रक्रिया क्लस्टर उभारणीकरिता जागा उपलब्ध करून दिली जाईल. विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र होईल विकसित परभणी होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...

सौर ऊर्जा प्रकल्पातील कामे पूर्ण झाल्यानंतर कृषिपंपांना मिळणार दिवसाचे १२ तास मोफत वीज.

जालना-नांदेड द्रुतगती समृद्धी महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी वाढल्याने परभणी जिल्ह्यात उद्योग येतील -

राज्य शासनाच्या १२०० सेवा व्हॉट्‍सॲपवर देण्याची व्यवस्था उभी करणार.

विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, देशातील विदेशी गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात.

परभणी जिल्ह्यात अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टरसाठी जागा उपलब्ध करून देणार.

जनकेंद्रित व्यवस्था सुरू करण्यासाठी कार्यालयांना १५० दिवसांचा कार्यक्रम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com