Paddy and Soybean : हरियाणात धान आणि मध्य प्रदेशमध्ये सोयबीन खरेदीची तारीख बदलली

Date of purchase of paddy and soybean : हरियाणा, मध्य प्रदेश राज्यात धान आणि सोयबीन खेरदीच्या तारखेच बदल करण्यात आला आहे. त्यामुळे येथील धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
Paddy and Soybean
Paddy and SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News : हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या धान आणि सोयबीन खेरदीच्या तारखेच बदल करण्यात आला आहे. हरियाणात धान खरेदी आता १ ऑक्टोबर पासून होणार असून ती आधी २३ सप्टेंबरपासून होणार होती. मध्य प्रदेशमध्ये देखील सोयबीनची खरेदी २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावेळी मध्य प्रदेश सरकारने नोंदणीच्या तारखेत देखील बदल केला आहे. आता नोंदणीची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर असेल.

हरियाणा सरकारने धान खरेदीची तारीख बदलली आहे. आधी २३ सप्टेंबरला धान खरेदी केली जाणार होती. पण आता १ ऑक्टोबरपासून पासून सुरू होईल. याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने २० सप्टेंबर आदेश जारी केले होते. ज्यात तारखेत बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तर केंद्र सरकारने खरीप विपणन हंगाम २०२४-२५ साठी सामान्य धानाचा हमीभाव २३०० रुपये आणि ग्रेड-अ धानाचा हमीभाव २३२० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे.

Paddy and Soybean
Paddy MSP : झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय; एमएसपी व्यतिरिक्त, धानावर प्रति क्विंटल १०० रुपये बोनस

सध्या देशभर पावसामुळे पिंकाना फटका बसला आहे. हरियाणात देखील सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने पिकांमध्ये ओलावा वाढला आहे. यामुळे पीक काढणीसह वाळणीला वेळ लागत आहे. तसेच आधीचा स्टॉक संपल्याशिवायस दुसरा स्टॉक खरेदी न करण्याचा निर्णय राईस मिलर्सनी घेतला आहे. यामुळे सरकारने धान खरेदीची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला. तर राज्यात धान खेरदीसाठी सरकारी २४१ केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच राज्य कृषी पणन मंडळाने शेतकऱ्यांसाठी १८००-१८०-२६०० हा हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. याशिवाय इतर खरीप पिके एमएसपीवर खरेदी करण्याची तयारीही पूर्ण झाल्याचा दावा सरकारने केला आहे.

सोयाबीनच्या नोंदणीत वाढ

मध्य प्रदेश सरकारने देखील सोयाबीनच्या खरेदीच्या नोंदणीची तारीख वाढवली आहे. तब्बल १० दिवसांची वाढ करत अंतिम तारीख १५ आक्टोंबर करण्यात आली आहे. याआधी शेवटची तारीख ४ ऑक्टोबर होती. सरकारने सोयाबीन शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची विक्री करण्यासाठी शेतकरी पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आता बुधवारी (ता.२५) नोंदणी विंडो उडण्यात येणार असून नोंदणी १५ आक्टोंबरपर्यंत करता येणार आहे. केंद्र सरकारने मध्य प्रदेशसाठी सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रूपये निश्चित केला आहे.

Paddy and Soybean
Paddy Disease Management : भातावरील प्रमुख रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

सरकारी खरेदी

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सरकारी खरेदी २५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. खरेदीची प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यभरात २० हून अधिक जिल्हानिहाय खरेदी केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

यंदा हमीभावात २९२ रुपयांनी वाढ

वाढीव हमीभावावर सोयाबीन खेरदी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्याप्रमाणे केंद्राने सोयाबीनच्या यंदाच्या हमीभावात २९२ रुपयांची वाढ केली. यंदा सोयाबीन ४८९२ रूपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. पण याआधी सोयाबीनची खरेदी ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात येत होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com