Paddy MSP : झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय; एमएसपी व्यतिरिक्त, धानावर प्रति क्विंटल १०० रुपये बोनस

Government of Jharkhand : केंद्र सरकारने २०२४-२५ साठी धानाच्या सामान्य जातीसाठी २ हजार ३००, ग्रेड -ए साठी २ हजार ३२० प्रति क्विंटल भाताचा एमएसपी निश्चित केला आहे.
Paddy MSP
Paddy MSPagrowon
Published on
Updated on

Pune News : झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षात धान खेरदीवर किमान आधारभूत किमती (एमएसपी) व्यतिरिक्त प्रति क्विंटल १०० रुपये बोनस जाहीर केला आहे. यासाठी शुक्रवारी (ता.२०) निर्णय घेण्यात आला असून एकूण ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२०) मंत्रिमंडळ बैठक झाली. यावेळी केंद्र सरकारने ठरवलेल्या धानाच्या एमएसपी व्यतिरिक्त प्रति क्विंटल १०० रूपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कॅबिनेट सचिव वंदना डडेल यांनी दिली आहे. यावेळी डडेल म्हणाल्या, केंद्र सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी धानाच्या सामान्य जातीसाठी २ हजार ३०० रुपये, ग्रेड -एसाठी २ हजार ३२० रुपये प्रति क्विंटल असा एमएसपी ठरवला आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार केंद्राच्या एमएसपी व्यतिरिक्त धानावर १०० रुपये प्रति क्विंटल बोनस देणार आहे. यासाठी ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Paddy MSP
Paddy MSP : धान हमीभावात पाच वर्षांत तुटपुंजी वाढ

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामात धान खरेदी केली जाणार आहे. सरकार एमएसपीवर शेतकऱ्यांकडून ६ लाख टन धान खरेदी करणार आहे. तर शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ज्यात धानाच्या खरेदीवर एमएसपी व्यतिरिक्त प्रति क्विंटल १०० रूपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Paddy MSP
Purchase of Ten Crops on MSP : एमएसपीवर दहा पिके खरेदी करण्याबरोबरच कॅनोलच्या पाण्याचे शुल्कही माफ, मुख्यमंत्री सैनी यांची घोषणा

तसेच राज्यभरातील २९ हजार ६०४ 'जल सहयोगी' (तळाच्या स्तरावर पिण्याच्या पाण्याची सेवा पुरवण्यात गुंतलेले लोक) यांना स्मार्टफोन देण्याची योजना देखील आहे. या योजनेतून जल सहयोगींना १२ हजार किमतीचे स्मार्टफोन देण्यात येणार आहेत.

भाताचे पीक घेणारी राज्ये

२०२३-२४ मध्ये भारतातील एकूण धान उत्पादन १ हजार ३६७ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तेलंगणा हे भारतातील अव्वल धान उत्पादक राज्य असून येथे १६६. ३१ लाख मेट्रिक टन धानाचे उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेश राज्यात ३० लाख हेक्टरवर धानाचे उत्पादन घेतले जाते. तर येथे १५० लाख मेट्रिक टनाहून अधिक उत्पान घेण्यात आले आहे. १५१.१८ लाख मेट्रिक टन धानाचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. पंजाबमध्ये १४३.९० लाख मेट्रिक टन धानाचे उत्पादन झाले असून १०१.३० लाख मेट्रिक टन भात उत्पादन ओडिशा राज्यात झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com