Humani Attack : अमरावतीत पाचशे हेक्टरवर हुमणी अळीचा प्रकोप

Humani outbreak Amaravati : यंदा खरीप हंगामाच्या आधी अवकाळीने धुमाकूळ घातला, त्यानंतर मॉन्सूनने आगमनास विलंब केला.
White Grub Pest Management
Humani Control Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : खरीप हंगामातील पिकांवर यंदा हुमणी अळीने आक्रमण केले आहे. सोयाबीन, कपाशीसह तुरीवर या अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला असून जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्रातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी धास्तावला असून उपाययोजना सुचविण्याची मागणी कृषी विभागास करण्यात आली आहे.

यंदा खरीप हंगामाच्या आधी अवकाळीने धुमाकूळ घातला, त्यानंतर मॉन्सूनने आगमनास विलंब केला. पावसाने मध्यंतरी खंड दिल्यानंतर संततधार धरली. आता हुमणी अळीने आक्रमण केल्याने शेतकरी संभाव्य नुकसानीने धास्तावला आहे.

White Grub Pest Management
Soybean Humani Control: सोयाबीनवरील हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ऊस पट्ट्यात दिसून येणाऱ्या या अळीचा यंदा विदर्भातही शिरकाव झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील पाचशे हेक्टर क्षेत्रात या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली. या अळीचा प्रादुर्भाव नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, अमरावती, अचलपूर या तालुक्यांत अधिक प्रमाणात असून अन्य भागांत तुरळक ठिकाणी झाला आहे.

White Grub Pest Management
Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाने हुमणी अळीचा प्रकोप झाल्याने नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करणारे निवेदन विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांना दिले. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये प्रकाश साबळे, समीर जवंजाळ, ज्ञानेश्वर काळे, कमल साखरे, राजू सरदार यांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या उपाययोजना, सल्ला

कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्या सल्ल्यानुसार पाऊस पडल्यानंतर सायंकाळी शेतातील कडूलिंब, बोर व बाभूळ या झाडांचे निरीक्षण करावे, त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावेत.

सातत्याने कीड येणाऱ्या भागात बाभूळ, बोर व कडूलिंब या झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करावी. सौम्य प्रादुर्भाव तुरळक ठिकणी असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम चार मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा प्रतिहेक्टरी एक किलो मेटॅरायझियम १०० किलो शेणखतात मिसळून फेकावे. लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास ४० टक्के फिप्रोनील, ४० टक्के इमिडॅक्लोप्रिड दानेदार पाच ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात द्रावण खोडांजवळ टाकावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com