Swarali Pawar
भुंगेरे अवस्थेत पाने तर अळी अवस्थेत अपूर्ण कुजलेले शेणखत आणि नंतर मुळे कुरतडून खाते. त्यामुळे सोयाबीन पिकाची रोपे वाळतात, पिवळे पडतात आणि पिकाची वाढ खुंटते.
रात्रीच्या वेळी भुंगेरे कडूलिंब, बोर आणि बाभुळच्या बसतात. मोठ्या बांबूने झाडे हलवून भुंगेरे पाडावे आणि गोळा करून रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकावे किंवा नष्ट करावे.
एक प्रकाश सापळा एक हेक्टर क्षेत्रास पुरेसा होतो. सापळ्यातील भुंगेरे गोळा करून मारून टाकावेत. यामुळे अंडी घालण्यापूर्वी भुंगेऱ्यांचा नाश होतो.
एरंडी बिया १ किलो (बारीक), यीस्ट पावडर ५० ग्रॅम, बेसन पीठ ५० ग्रॅम, ताक अर्धा लिटर हे सर्व मिश्रण २ लिटर पाण्यामध्ये भिजवून २ ते ३ दिवस आंबवून घ्यावे. तयार मिश्रण मातीच्या मडक्यामध्ये ओतून हे मडके एकरी ५ मातीमध्ये ठेवावे.
आंतरमशागतीत कोळपणी करताना जमिनीवर आलेल्या हुमणी किडीच्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. सुकलेले पिक उपटून त्याच्या मुळाखालील अळ्या गोळा करुन नष्ट कराव्या.
मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली ही बुरशी हुमणीवर अतिशय प्रभावशाली आहे. मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली (१.१५% WP) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आवळणी करावे.
किडींना रोगग्रस्त करणाऱ्या सुत्रकृमीवर आधारित (हेटरोऱ्हॅबडीटीस इंडिका) घटकाची मुळाजवळ आळवणी २.५ लिटर प्रती हेक्टर (१००० आयजे प्रती मिली) ५०० लिटर पाणी करावी.
सध्या सोयाबीन पिकात केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून कोणतेही रासायनिक कीटकनाशक लेबल क्लेम म्हणून देण्यात आलेले नाही.