Modern Farming: शेतीला येईल व्यापाराचे रूप: शेतीचा नवा काळ

Digital Agriculture: शेती आता केवळ उत्पादनापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती आधुनिक बिझनेस मॉडेलकडे वाटचाल करणार आहे. बँकिंग, ई-कॉमर्स, थेट विक्री आणि आधुनिक गुंतवणूक यामुळे शेतकरी अधिक सक्षम होतील व बाजारपेठेशी थेट जोडले जातील.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology: शेती ही केवळ काळी आई न राहता ‘ॲग्री बिझनेस’ म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की वाढीला लागेल. शेतीचा व्यवसाय हा अधिक व्यापारी पद्धतीने होताना बँकिंग व्यवस्था, वैयक्तिक विमा व पेन्शन, शेअर मार्केट, मुच्युअल फंड, टर्म इन्शुरन्स आदींशी शेतकऱ्यांची नवी पिढी अधिक जवळिकीने काम करायला लागेल.

भविष्यातील शेतीचा विचार करता शेतीक्षेत्रातील अनेक गोष्टींमध्ये जो बदल होईल त्यामध्ये प्रकर्षाने जाणवेल असा महत्त्वाचा बदल म्हणजे पुढच्या १५-२० वर्षांत महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी आधुनिक बाजारपेठेशी जोडला जाईल. शेतकऱ्यांकडे पण सर्रास आधुनिक व अँड्रोइड मोबाइल असतील. शहरी भागात होत असलेल्या होम डिलिव्हरी, मालाची परतफेड, किमतीमधील डिस्काउंट, एकत्रितरीत्या माल खरेदी केल्याचे फायदे, सर्वांत स्वस्त वाहतुकीच्या साधनांचा वापर, मार्केटमधील दर पाहून वस्तू खरेदी किंवा विक्री करण्याची पद्धत, व्याजाचे दर, धरण्यात येणारी तूट, कसर,

हमाली, आगाऊ विक्री, त्यासाठी आगाऊ रक्कम, आदी. व्यापारी लोक वापरत असलेले सर्व पैलू आता ग्रामीण भागात सुद्धा दिसू लागले आहेत. याचा योग्य तो वापर शेतकरी करतील. एखाद्या गावातील भाजीपाला पिकविणारे शेतकरी स्वतंत्र माल बाजारपेठेत नेण्यापेक्षा एकत्रितरीत्या एकाच वाहनाने नेल्यास किती फायदा होतो, किती वेळ, परिश्रम वाचतात याचा अचूक हिशेब करायला शिकतील.

Agriculture
Agriculture Technology : नवी पीकपद्धती, तंत्रज्ञान वापरातून ‘देगाव’ची वाटचाल

डायरेक्ट मार्केटिंग वाढेल

शेतीमालाच्या विक्रीसाठी वापरात येत असलेले छोटे छोटे ॲप सर्रास शेतकरी वापरु शकतील व आपला माल थेट बाजारपेठेत कसा विकता येईल, त्यासाठी कमीत कमी खर्च कसा येईल यामध्ये शेतकरी प्रावीण्य मिळवतील. ग्रामीण बाजारपेठ बळकावण्याची इच्छा असणाऱ्या अनेक कंपन्यांबरोबर शेतकरी कठोर बार्गेनिंग करतील. स्थानिक बाजारपेठेत कोणता शेतीमाल विकायचा व होलसेल बाजारपेठेत कोणता विकायचा याचे तारतम्य शेतकऱ्यांकडे येईल.

अशा पद्धतीने शेतीमाल कितीही कमी असला तरी स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये येईल. त्यामुळे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर वाढीला लागून आपल्या शेतीमालाला एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कोणते दर मिळत आहेत, हे प्रत्येक शेतकऱ्याला कळू शकेल. डायरेक्ट मार्केटिंग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल.

Agriculture
Agriculture Technology: दुभत्या पशुधनाच्या संतुलित आहारासाठी ‘टीएमआर मशिन’

प्रक्रियेकडे असेल कल

शेतीमालाच्या किमती शहरी भागात गेल्यानंतर कशा कशा वाढत जातात हे समजून घेण्यासाठी शेतीमालामध्ये वर्गीकरण करणे, प्रतवारी करणे, काही माल हा स्थानिक बाजारपेठेत विकणे व काहींमध्ये जास्त किंमत मिळण्यासाठी आधुनिक पॅकिंग करणे या सर्व गोष्टी वैयक्तिक शेतकऱ्याच्या पातळीवर होऊ शकतील. दळणवळणाची साधने वाढतील त्याप्रमाणे ग्रामीण भागात दळणवळण असणाऱ्या सर्व शहरी लोकांमार्फत थेट शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्यामध्ये प्रचंड वाढ होईल.

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा कृषी पर्यटनाच्या ठिकाणी थेट शेतीमाल विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. जास्त किंमत मिळण्यासाठी प्रक्रिया करण्याच्या छोट्या छोट्या मशिनरी आता स्वस्तात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्याचा योग्य तो वापर शेतकरी करतील. महाराष्ट्रातील शेतीमालावर आधारलेले जाम, जेली, वाळवण केलेले पदार्थ व भाजीपाला, लोणचे, कोकम, चटण्या अशा प्रकारचे सुंदर पॅकिंग केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ थेट शेतकऱ्यांकडून घेण्याचा कल वाढीस लागेल.

जसजसे शेती क्षेत्रातून मनुष्यबळ अन्य क्षेत्रात जाईल तसतसे शासकीय धोरणसुद्धा पूर्ण वेळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने झुकण्यास मदत होईल. ॲग्रीस्टॅकसारखे प्रकल्प आल्यामुळे फक्त शेती करणारे लोक आणि कागदावर शेती धारण करणारे लोक यामध्ये स्पष्टपणे फरक निर्माण होईल. शासकीय धोरण सुद्धा फक्त शेती करणाऱ्या लोकांच्या बाजूने अधिक मदत करणारे होईल. आत्तापर्यंत आपण पाहत असलेल्या व्यावसायिकांच्या कॉन्फरन्स शेतकऱ्यांमध्ये आयोजित केल्या जातील. c, साठवणुकीसाठी अत्याधुनिक गोदाम, डिजिटल प्लॅटफॉर्म, शेतीमालाचे आगाऊ बुकिंग व ॲडव्हान्स, त्यांचे प्रशिक्षण, मार्केटमधील सुविधा या सगळ्यांमध्ये गुंतवणूक वाढेल. सबसीडी अधिक शेतकरीकेंद्रित व लक्ष्य निर्धारित होतील.

शेती नव्हे, तर ॲग्री बिझनेस

शेतीचा व्यवसाय हा अधिक व्यापारी पद्धतीने होताना बँकिंग व्यवस्था, वैयक्तिक विमा व पेन्शन, शेअर मार्केट, मुच्युअल फंड, टर्म इन्शुरन्स, अशा गोष्टींशी शेतकऱ्याची नवी पिढी अधिक जवळिकीने काम करायला लागेल. पैशाची बचत करून व्यापारी लोक पैशाला पैसा कसा जोडतात याचे तंत्र शेतकरी आत्मसात करतील. उसाचे किंवा सोयाबीनचे एकदम आलेले दोन चार लाख रुपये काही दिवसांसाठी कोठे गुंतवणूक केल्यावर फायदा होईल, असा विचार करणारी शेतकऱ्यांची पहिली पिढी जन्माला येईल. शेती ही केवळ काळी आई न राहता ‘ॲग्री बिझनेस’ म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढीला लागेल.

shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com