Agri Hackathon 2025: पुण्यात उद्यापासून ‘कृषी हॅकेथॉन’

Agri Innovation: ‘शेतीला फायदेशीर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
Ai For Agriculture Hackathon
Ai For Agriculture HackathonAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘‘शेतीला फायदेशीर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. ही भारतातील पहिली कृषी हॅकेथॉन असून, रविवार (ता. १) ते मंगळवार (ता. ३) जूनदरम्यान पुण्यातील कृषी महाविद्यालयात होणार आहे.

कृषी हॅकेथॉन स्पर्धा आठ क्षेत्रांत घेतली जाणार असून, देशभरातील विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि पारंपरिक शेती करणारे शेतकरी सहभागी होणार आहेत.’’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

Ai For Agriculture Hackathon
Agriculture Innovation: केळी, अंजीर, आंबा आणि स्ट्रॉबेरीसाठी 'क्लस्टर मॉडेल'; कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना!

हॅकेथॉनचे उद्‌घाटन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कृषी विभाग, महात्मा फुले कृषी वि‌द्यापीठ आणि कृषी महावि‌द्यालयासह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने ही हॅकेथॉन आयोजित केली आहे. ‘‘या स्पर्धेसाठी ५६० जणांनी सादरीकरण पाठवले होते. त्यापैकी १४० जणांची निवड केली आहे. या सर्वांचे प्रदर्शन तीन दिवस असणार आहे.

Ai For Agriculture Hackathon
Ai in Farming: प्रमुख पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या १४० पैकी सोळा जणांची पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी निवड केली जाणार आहे. त्यानंतर खरीप हंगामात शेतीमध्ये प्रत्यक्ष त्याचा उपयोग केला जाईल. त्यानंतर तंत्रज्ञानाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात होईल,’’ असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

डुडी म्हणाले, ‘‘जम्मू- काश्मीर, कर्नाटक, दिल्लीसह सर्वच राज्यांतून विद्यार्थी, शेतकरी, स्टार्टअप सहभागी झाले आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके तसेच अग्रगण्य कृषी स्टार्टअप इन्क्यूबेटरकडून निधी दिला जाणार आहे.

...हे उपाय सुचविले जाणार

हॅकेथॉनच्या माध्यमातून लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कमी खर्चिक, सोपे आणि परिणामकारक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा विश्‍लेषण यांचा शेतीमध्ये वापर करणे, हवामान बदल, पाणीटंचाई यांसारख्या दीर्घकालीन समस्यांवर उपाय शोधून कृषी क्षेत्र बळकट करणे, पाणीटंचाई, खतांचा अपव्यय, पीक संरक्षण यावर उपाय सुचविण्यात येणार आहे.

पारितोषिके

विजेते पारितोषिक : २५ लाख रुपये (प्रत्येक क्षेत्रातील आठ विजेते)

उपविजेते पारितोषिक : १५ लाख रुपये (प्रत्येक क्षेत्रातील आठ उपविजेते)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com