Fruit Festival : फळ महोत्सवात ७५ हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Horticulture : कृषी पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. इथला बळीराजा कष्टाने आपली शेती फुलवतो.
Fruit Festival
Fruit FestivalAgrowon
Published on
Updated on

Sangli News : कृषी पंढरी म्हणून सांगलीची ओळख आहे. इथला बळीराजा कष्टाने आपली शेती फुलवतो. त्याने पिकवलेली फळे त्यांचा अतिउच्च दर्जा पहण्याची संधी तमाम सांगलीकरांना मिळणार आहे.

निमित्त आहे फळ महोत्सावाचे. नेमीनाथनगर येथील कल्पद्रूम क्रीडांगणावर रविवापासून (ता. २३) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे ७५ हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ‘शेतकरी ते ग्राहक’ ही संकल्पना इथे दिसून येईल.

Fruit Festival
Fruit Crop Farming : फळपिकांतून गाठली आर्थिक सक्षमता

कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली जिल्हा परिषद व शासनाचा कृषी विभाग, पणन महामंडळ आणि महानगरपालिका, जिल्हा माहिती कार्यालय कृषी निविष्टा उत्पादकांची फळ महोत्सव समिती, द्राक्ष बागायतदार संघ, ॲग्रो इनपूट्स डीलर्स असोसिएशन आदी विभाग-संघटना या महोत्सवाच्या संयोजक आहेत.

सांगलीत रविवार (ता. २३) ते गुरुवार (ता. २७) फळ महोत्सव सुरू राहणार आहे. पाच दिवसांच्या महोत्सवात सांगलीसह शेजारील जिल्ह्यांतील द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, ड्रॅगन फ्रुट, केळी, कलिंगड, पेरू, स्ट्रॉबेरी, आंबा, चिकूसह विविध फळे विक्रीसाठी शेतकरी घेऊन येणार आहेत.

Fruit Festival
Ber Fruits : सोलापूरच्या बोरांची बाजारात चलती ; चमेली, उमराणला बोरांना वाढती मागणी

जिल्ह्यातील विविध फळ उत्पादकांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ७५ हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. विविध विभाग आणि संघटनांकडे शेतकरी नोंदणी करत आहेत.

महोत्सवादरम्यान विविध उपक्रम होणार आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटापर्यंत असणाऱ्या चित्रकला स्पर्धा, पाककृती स्पर्धा, फळ सजावट आरास स्पर्धा, तसेच ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ असे खेळ होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com