मुंबई : राज्यात एकूण ६०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Election 2022) झाली. त्याच्या निकालाची माहिती आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून गोळा केली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला सर्वाधिक १७३ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेस पक्ष ८४, भाजप १६८ आणि शिंदे गटाला ४२ जागांवर विजय मिळाला आहे.
उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या, याची अधिकृत माहिती आमच्याकडे नाही. मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळविली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे,’’ अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.
श्री. पवार यांनी मुंबईच्या यशवंतराव प्रतिष्ठान सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला मोठे यश मिळाल्याचा दावा केला होता. परंतु आता श्री. पवार यांनी हा दावा खोडून काढला आहे.
श्री. पवार म्हणाले, ‘‘आमच्याकडे असलेली अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगितली. आता त्यांना ते सर्वाधिक जागा जिंकले आहेत, या आनंदात राहायचे असेल तर राहू द्या.’’ शिंदे-फडणवीस सरकार कोरोना काळात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप श्री. पवार यांनी केला. ‘‘कोरोना काळात काही मुलांचे पालक मृत्युमुखी पडले होते. अशा मुलांना मदत करण्यासंदर्भात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी धोरण जाहीर केले. परंतु, सरकारने हे अनुदान स्थगित केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.