Group Secretaries
Group SecretariesAgrowon

सोलापुरातील ४५० गटसचिवांचे पगार सव्वादोन वर्षांपासून रखडले

सोलापूर जिल्ह्यातील गावपातळीवर विकास सोसायट्यांचे गटसचिव म्हणून काम करणाऱ्या सुमारे ४५० गटसचिवांचे पगार तांत्रिक कारणामुळे गेल्या तब्बल सव्वा दोन वर्षापासून रखडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील गावपातळीवर विकास सोसायट्यांचे (Primary Credit Society) गटसचिव म्हणून काम करणाऱ्या सुमारे ४५० गटसचिवांचे पगार (Salary) तांत्रिक कारणामुळे गेल्या तब्बल सव्वा दोन वर्षापासून रखडले आहेत. गटसचिवांनी या बाबत जिल्हा बँक प्रशासन आणि शासनाकडेही त्यांच्या पगाराबाबत सातत्याने पाठपुरावा केला. पण त्याची कोणतीच दखल घेतली नसल्याने सध्या हे गटसचिव आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. ऐन दिवाळीत त्यांच्यावर शिमगा करण्याची वेळ आली आहे.

Group Secretaries
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा देखरेख संघ अर्थात केडरमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १२०० सहकारी संस्थेच्या ४५० गटसचिवांचा पगार गेल्या मे २०२० पासून थकला आहे. मुख्यतः सहकारी सोसायट्यांनी सचिवांच्या पगारापोटी शासनाने तरतूद केलेली ठराविक रक्कम न भरल्याने बँकेने सचिवांचे पगार व अन्य देणी थांबवली आहेत, असे सांगण्यात आले.

Group Secretaries
Agricultural Laborers : भात कापणीसाठी कामगार मिळेना

परंतु पूर्वीपासून सचिवांच्या पगारापोटी सहकारी संस्था सव्वापट वर्गणी केडरकडे भरते. जिल्हा बँक बरखास्त झाल्यानंतर पहिल्या दीड वर्षात या पद्धतीनेच सचिवांच्या पगारी झाल्या. मात्र, मे २०२० पासून सव्वापट वर्गणी न स्वीकारता कर्ज वसुलीच्या दोन टक्केप्रमाणे ही रक्कम भरा, असा नियम बँक प्रशासनाने केला. त्यामुळे या पगारी रखडल्याचे सांगण्यात आले.

सेवानिवृत्तांचीही परवड

विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात ५० सचिव सेवानिवृत्त झाले आहेत. तर दहा सचिव मरण पावले आहेत. त्या सचिवांच्या पगारी आणि त्यांचा फंडही अडकून पडला आहे. या निवृत्तांनाही पगारी, निवृत्तीनंतरची ग्रॅच्युइटी, फंड, रजेचा पगार हेही अद्याप मिळाले नाही. आता यापैकी अनेक सचिव आणि त्यांचे कुटुंबीयही त्यासाठी पाठपुरावा करत आहेत, पण त्याची दखल घेतली जात नाही. त्यांचीही नुसती परवड सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com