Crop Loan : जिल्हा बँक, ग्रामीण बँकेची पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना एकूण १ हजार १०५ कोटी २६ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

परभणी ः परभणी जिल्ह्यात चालू आर्थिक (२०२२-२३) वर्षातील पहिल्या चार महिन्यांत (जुलै अखेरपर्यंत) सर्व बँकांनी मिळून ७७ हजार ७७२ शेतकऱ्यांना ५४७ कोटी ४ लाख रुपये (४५.४३ टक्के) पीककर्जाचे वितरण (Crop Loan Distribution) केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Cooperative Bank) (१००.५८ टक्के) आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank) (११२.८२ टक्के) एवढे पीककर्ज (Crop Loan) वाटप करत यंदाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंक (व्यापारी बँका)आणि खासगी बँकांचे कर्जवाटप अतिशय संथ गतीने सुरू आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना एकूण १ हजार १०५ कोटी २६ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.त्यात राष्ट्रीयकृत (व्यापारी) बॅंका ७०४ कोटी १३ लाख रुपये, खासगी बँका ९२ कोटी ३६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँक १६९ कोटी २३ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १४० कोटी ५४ लाख रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे.

Crop Loan
Crop Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

जुलै अखेरपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांनी १६ हजार ४८८ शेतकऱ्यांना १७० कोटी ७२ लाख रुपये (२२.२२ टक्के) पीककर्ज वाटप केले. खासगी बँकांनी १ हजार २८५ शेतकऱ्यांना १५ कोटी ५४ लाख रुपये पीककर्ज दिले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २३ हजार ३०७ शेतकऱ्यांना २०८ कोटी ३१ लाख रुपये (११२.८२ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३६ हजार ६४२ शेतकऱ्यांना १५२ कोटी ४७ लाख (१००.५८ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा बॅंक आघाडीवर

सर्वच बँकांनी नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या बाबतीत हात आखडता घेतला आहे. ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील ९ हजार २१९ शेतकऱ्यांना ९० कोटी ६६ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज वाटप करण्यात आले. तर ६८ हजार ५०३ शेतकऱ्यांनी ४५६ कोटी ३८ लाख रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. गतवर्षी (२०२१) जुलै अखेरपर्यंत ७४ हजार ४०३ शेतकऱ्यांना ४५५ कोटी ३१ लाख रुपये (३७.५३ टक्के) एवढे पीककर्ज वाटप झाले होते.

बँक निहाय जुलै अखेरपर्यंतची पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बँक...उद्दिष्ट...वाटप कर्ज रक्कम...शेतकरी संख्या...टक्केवारी

भारतीय स्टेट बँक...४५१.००...११८.२९...११७७८..२४.०४

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक...१६९.२३...२०८.३१...२३३०७...११२.८२

जिल्हा सहकारी बॅंक...१४०.०५...१५२.४७...३६६४२...१००.५८

बँक ऑफ बडोदा...५१.९०...५.२४...४९९...९.२५

बॅक ऑफ इंडिया...९.३१...१.८२...१७२...१७.९१

बँक ऑफ महाराष्ट्रा...६३.६९...२७.९६...२१२४...४०.२४

कॅनरा बँक...३७.३१...३.७५...४८६...९.२१

सेंट्रल बँक ऑफ इंडिया...९.५४...४.२८...४०३...४१.११

इंडियन बँक...१९.०४...१.८७...१८९...९.००

इंडियन ओव्हरसिज बँक...८.१९...१.३१...१४३...१४.६५

पंजाब नॅशनल बँक...८.५५...०.२५...२५...२.६८

यूको बँक...१८.६४...२.६७...२७७...१३.१३

युनियन बँक...२६.९६...३.२८...३९२...११.१५

अॅक्सिस बँक...९.८७...०.५०...११...४.६४

एचडीएफसी बँक...३०.१३...७.२३...३९७...२२.००

आयसीआयसीआय बँक...२८.७८...५.४२...४८४...२०.८९

आयडीबीआय बँक...२७.५८...२.३९...३९३...७.९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com