
हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) शनिवार (ता. ९) पर्यंत ५२ हजार १४८ शेतकऱ्यांना ३३२ कोटी ३ लाख ४२ हजार रुपये (४०.९९ टक्के) पीक कर्जवितरण (Crop Loan) केले आहे. सद्यःस्थितीत पीककर्ज वाटपात (Crop Loan Supply) महाराष्ट्र ग्रामीण बँक आघाडीवर (Maharashtra Grameen Bank) आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँकांचा क्रम आहे.
जिल्ह्यातील विविध बँकांना यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख २४ हजार १६२ शेतकरी सभासदांना ८१० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात जिल्हा बँकेला २१ हजार ३८५ सभासदांना १३९ कोटी ५० लाख १६ हजार रुपये, व्यापारी बँकांना ७९ हजार ९२९ सभासदांना ५२१ कोटी ३९ लाख ८९ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २२ हजार ८४८ सभासदांना १४९ कोटी ९ लाख ९५ हजार रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.
शनिवार (ता. ९) पर्यंत जिल्हा बँकेने २५ हजार ५५३ सभासदांना ८६ कोटी ३७ लाख ४३ हजार रुपये, व्यापारी बँकांनी ११ हजार ६५८ सभासदांना १२० कोटी ६५ लाख ९९ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १४ हजार ९५६ सभासदांना १२५ कोटी रुपये पीक कर्जवाटप केले. व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट आहे. परंतु कर्जवितरणात या बँकांची उदासीनता कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.
बँकनिहाय पीक कर्जवितरण स्थिती (कोटी रुपये)
बँक...उद्दिष्ट...वाटप...शेतकरी संख्या...टक्केवारी
महाराष्ट्र ग्रामीण बँक...१४९.०९...१२५.००...१४९५६...८३.८४
जिल्हा सहकारी बँक...१३९.५०...८६.३७...२५५३४...६१.८२
व्यापारी बँका...५२१.३९...१२०.६५...११६५८...२३.१४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.