Crop Loan : पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा बॅंक आघाडीवर

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी जुजबी पण आवश्‍यक कागदपत्रे घेऊन तत्काळ त्यांना एकरी मंजूर असणारे कर्ज दिले जाते. जिल्ह्यात सुमारे पन्नासहून राष्ट्रीयीकृत आणि नागरी सहकारी बॅंका कार्यरत आहेत.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून (Kolhapur District Bank) तब्बल २ हजार १४४ कोटी ३६ लाख रुपये पीककर्ज (Crop Loan) वाटप करण्यात आले आहे. या तुलनेते राष्ट्रीयीकृत व इतर बॅंकांकडून ६७८ कोटी ८० लाख रुपये वाटप झाले आहेत. यात जिल्हा बॅंकेने पीककर्ज वाटपाचे (Crop loan Distribution) १२३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर, राष्ट्रीयीकृत बँकांकडून (Nationalize Bank Crop Loan) ७० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा बॅंक नेहमीच तत्पर आहे. गावपातळीवरील सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जाते.

Crop Loan
Crop Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी जुजबी पण आवश्‍यक कागदपत्रे घेऊन तत्काळ त्यांना एकरी मंजूर असणारे कर्ज दिले जाते. जिल्ह्यात सुमारे पन्नासहून राष्ट्रीयीकृत आणि नागरी सहकारी बॅंका कार्यरत आहेत. यापैकी, पीककर्ज वाटपाचा सर्वाधिक वाटा एकट्या जिल्हा बॅंकेकडून उचलला जातो. जिल्ह्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जात आहे. प्रत्येक वर्षी जिल्हा बॅंकेकडे कर्जवाटपाची टक्केवारी वाढवली जात आहे. या तुलनेत राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही कर्जवाटपाची धुरा सांभाळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Crop Loan
Crop Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची पीककर्ज वितरणात आघाडी

जिल्हा बॅंकेकडून ज्या शेतकऱ्यांने पूर्वीचे पीककर्जाची परतफेड केली आहे. त्या शेतकऱ्याला मागणीवरून तत्काळ कर्ज उपलब्ध करून देत आहे. दरम्यान, तीन लाखांपर्यंत व्याज आकारणी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

कर्जवाटपाचे जिल्हा बॅंक व इतर बॅंकांचे उद्दिष्ट

बॅंक* २०२१-२२ मधील उद्दिष्ट* पीककर्ज वाटप* उद्दिष्ट टक्केवारी

जिल्हा बॅंक* १७५० कोटी* २१४४ कोटी ३६ लाख* १२३ टक्के

राष्ट्रीयीकृत व इतर बॅंक* ९७० कोटी* ६७८ कोटी ८० लाख* ७० टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com