Lumpy Skin : ‘लम्पी’वर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा :गुप्ता

‘लम्पी’ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,’’ अशा सूचना पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी दिल्या. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) हा पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाना, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात थैमान घालून आता महाराष्ट्रात वेगाने पसरताना दिसत आहे. ‘लम्पी’ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,’’ अशा सूचना पशुसंवर्धन विभागाचे (Animal Husbandry Maharashtra) प्रधान सचिव जे. पी. गुप्ता (J.P. Gupta) यांनी दिल्या.राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग, डॉ. विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पशुसंवर्धन उपायुक्त मंजूषा पुंडलिक, उपजिल्हाधिकारी निवडणूक मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पी स्कीन : गांभीर्याने घ्या...

कोरोना काळातील परिस्थितीप्रमाणे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळा. केंद्र सरकारच्या २००९ च्या ॲक्टनुसार पशुधनास वेळेवर उपचार मिळतील, याची काळजी घ्या. गाय, म्हैस व बैलांची आंतरराज्यीय वाहतूक बंद करा, जेणेकरुन तेथील पशुधनाला आजाराचा प्रार्दुभाव येथे होणार नाही. सर्व साधनसामुग्री उपलब्ध ठेवा. निधीची कमतरता पडणार नाही. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध आहे. जिल्ह्यात १० हजार लशी उपलब्ध आहेत. त्यासोबत औषधांचा साठा तयार ठेवा. शासकीय पशुवैधकांकडूनच पशुंचा उपचार करा.

Lumpy Skin
Lumpy Skin Disease : जागरूक राहा, उपाययोजना करा...

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येतील. सद्यःस्थितीत जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाची मदत घ्या. प्रत्येक गावात फवारणी करून प्रादुर्भावग्रस्त आणि इतर जनावरांचे विलगीकरण करा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रादुर्भावग्रस्त गावास भेट द्यावी. ग्रामीण भागात सर्वदूर जनजागृती करा. सरपंच व ग्रामसेवकांना मागदर्शन करून रुग्ण पशूंचे विलगीकरण, बाजार बंदी या कडे लक्ष देण्याच्या सूचना कराव्यात. लक्षणे असलेल्या पशूंना तत्काळ मोफत उपचार व औषधोपचार करावेत. जिल्हा परिषद प्रशासनाने लक्षणे दिसताच पशूंवर उपचार करावेत. टोल फ्री क्रमांक १९६२ वर माहिती द्यावी,’’ अशा सूचनाही गुप्ता यांनी दिल्या.

अजून ५० हजार लस प्राप्त होणार

‘‘राज्यात ४ हजार ८५० दवाखाने आहेत. येथील डॉक्टरांनी स्वतः: भेट देऊन उपचार करावेत. ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करावी. ३ लाख लस उपलब्ध आहेत. लवकरच अजून ५० हजार लस प्राप्त होतील. जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. यासाठी यंत्रणा सज्ज ठेवाव्यात,’’ अशा सूचना सिंग यांनी दिल्या.

नागपूर ः पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ‘लम्पी’च्या नियंत्रणाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com