अक्कलकोटमधून स्वामी समर्थांच्या पालखी परिक्रमेला सुरुवात

यंदाचे २६ वे वर्ष असून, ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय...’च्या जयघोषात गुरुवारी (ता. १०) श्रीक्षेत्र अक्कलकोट येथून या परिक्रमेला सुरुवात झाली.
अक्कलकोटमधून स्वामी समर्थांच्या पालखी परिक्रमेला सुरुवात
Published on
Updated on

अक्कलकोट, जि. सोलापूर ः श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २५ वर्षांपासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते, यंदाचे २६ वे वर्ष असून, ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय...’च्या जयघोषात गुरुवारी (ता. १०) श्रीक्षेत्र अक्कलकोट येथून या परिक्रमेला सुरुवात झाली.

अक्कलकोटमधून स्वामी समर्थांच्या पालखी परिक्रमेला सुरुवात
Cotton Rate : कापसाला काय दर मिळाला ?

दरम्यान, या परिक्रमेचा प्रारंभ देवस्थानचे पुजारी मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुरोहित प.पू अण्णू महाराज पुजारी आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींच्या पदुकाचे पूजन करून करण्यात आले.

अक्कलकोटमधून स्वामी समर्थांच्या पालखी परिक्रमेला सुरुवात
Soybean Cotton : सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय द्या ः तुपकर

महाप्रसादालयात पादुका पूजन, शमीविघ्नेश मंदिर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ, श्री खंडोबा मंदिर येथील पूजनानंतर परिक्रमा ही सोलापूरकडे मार्गस्थ झाली. या प्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामकाका मोरे, विश्‍वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, लाला राठोड, सुरेशचंद्र सूर्यवंशी, सी.ए. ओंकारेश्वर उटगे, लक्ष्मण पाटील, अप्पा हंचाटे उपस्थित होते.

१८३ दिवस, दहा हजार किलोमीटरचा प्रवास

गेल्या २५ वर्षांपासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. या काळात सुमारे १८३ दिवसांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून १० हजार किलोमीटरचा प्रवास करत ही परिक्रमा ८ मे २०२३ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार असल्याचे माहिती न्यासाचे पालखी परिक्रामाचे मुख्य संयोजक संतोष भोसले यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com