Team Agrowon
कापसाच्या दरात (Cotton Rate) आजही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली.
मात्र कापसााची आवक (Cotton Arrival) वाढलेली नाही, असं उद्योगांनी सांगितलं. आज कापसाचा किमान दर काही राज्यांमध्ये वाढला होता तर कमाल दरानेही काही ठिकाणी उसळी घेतली होती.
देशातील बाजारात दिवाळीनंतर कापसाची आवक कमी झाली. त्यामुळं बाजारात कापसाचे दर वाढले आहेत.
त्यातच उद्योगांनी आता कापसाची खेरदी सुरु केली. परिणामी कापसाची दरवाढ सुरुच आहे. सध्या कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ९ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.
तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर वाढत आहेत. त्यामुळं देशातील कापूस दरवाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय.
शेतकऱ्यांना यंदा किमान सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेूऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.