Dairy Business : दूध व्यवसायाच्या गुणात्मक वाढीसाठी अभ्यासगट

Milk Production : दूध व्यवसायातील त्रुटी दूर करण्यासह खासगी व सहकारी दूध व्यवसायिकांमध्ये निकोप स्पर्धेत लोकांना चांगले दूध मिळण्यासाठी शासनाने पंधरा जणांचा अभ्यासगट केला आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दूध व्यवसायातील त्रुटी दूर करण्यासह खासगी व सहकारी दूध व्यवसायिकांमध्ये निकोप स्पर्धेत लोकांना चांगले दूध मिळण्यासाठी शासनाने पंधरा जणांचा अभ्यासगट केला आहे. महाराष्ट्रात दुग्ध व्यवसायाच्या गुणात्मक वाढीसाठी हा अभ्यास गट शासनाला शिफारशी करणार आहे.

राज्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी दूध व्यवसाय करतात. मात्र सरकारी धोरणामुळे, खासगी दूध संघातील स्पर्धेमुळे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हा व्यवसाय अस्थिर आहे. बटर, पावडरीच्या दरावर दूध व्यवसाय अवलंबून आहे.

मात्र बटर, पावडरीचे दर कमी झाल्याचे सांगत सातत्याने दुधाचे दर पाडले जात असल्याचा अनुभव आहे. दुधाला दर मिळावा यासाठी मोठमोठी आंदोलने झाली. कोरोना काळात जवळपास तीन वर्ष हा व्यवसाय मोडकळीस आला होता.

आता कुठे सहा महिन्यांपासून दर वाढत असताना गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा पावडर, बटरचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाचे दर कमी झाले आहेत.

सातत्याने अस्थिर होत असलेल्या दूध व्यवसायाच्या परिस्थितीबाबत आमदार हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत सहकार क्षेत्रातील दुग्धव्यवसायाच्या गुणात्मक वाढीसाठी उपाययोजना करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी अभ्यासगट करण्याबाबत दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समावेश असलेला १५ जणांचा अभ्यासगट केला आहे.

आता हा अभ्यासगट दूध व्यवसायाच्या वाढीसाठी व शेतकऱ्यांना फायदेशीर राहणाऱ्या कोणत्या शिफारशी शासनाला सादर करेल, याकडे राज्यातील दूध व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे.

Milk Rate
Gokul Milk Union : ‘गोकुळ’तर्फे मँगो, व्‍हॅनिला लस्सी, मसाला ताकाचे उत्पादन

दूध भेसळ मोठा मुद्दा

राज्यात साधारण सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. याशिवाय ५० लाख लिटरच्या जवळपास दूध थेट ग्राहकांना शेतकरी विकतात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार सातत्याने समोर आले आहेत.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात दूध भेसळ पकडल्यानंतर या एका तालुक्यात जवळपास एक लाख लिटर दूध कमी झाले. यावरुन राज्यातील दूध भेसळीची व्याप्ती दिसून आली. दूध भेसळ हा दूध व्यवसायातील मोठा मुद्दा आहे.

दूध भेसळीमुळेच अनेकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खाणे सोडलेले आहे. शासनाने नियुक्त केलेला हा अभ्यासगट दूध भेसळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काय उपाययोजना सुचवते याकडेही राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Milk Rate
Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाकडे लक्ष द्या...

अभ्यास गटातील सदस्य

दुग्धविकासमंत्री (अध्यक्ष), अन्न व नागरीपुरवठा मंत्री, अन्न व औषध प्रशासनमंत्री, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार, आमदार हरिभाऊ बागडे, सुरेश धस, विनय कोरे, माणिकराव कोकाटे, संग्राम थोपटे, प्रकाश आबीटकर, ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, ‘महानंद’चे संचालक राजकुमार कुथे, आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग, आयुक्त अन्न व प्रशासन, नियंत्रक वैद्यमापन शास्त्र, व्यवस्थापकीय संचालक, महानंद, विभागीय व्यवस्थापक, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, सहनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध), मुंबई, उपसचिव (दुग्ध).(सर्व सदस्य)

अभ्यासगटाचे काम

- सहकारी दूध व्यवसायाच्या गुणात्मक वाढीसाठी उपाययोजना सुचविणे.

- सहकारी व खासगी दुग्ध क्षेत्रावर शासनाचे नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुचविणे

- सहकारी व खासगी दुग्ध व्यवसायिकांमध्ये निकोप स्पर्धेद्वारे जनतेस चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच दुग्धउत्पादकास योग्य दर मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवणे.

- सहकार क्षेत्रातील दुग्धव्यवसायिकांना दुग्ध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अर्थसाहाय्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविणे.

- दुधातील भेसळ रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने शिफारशी करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com