Milk Production : स्वच्छ दूध उत्पादनाकडे लक्ष द्या...

Milk Production Update : आवश्यक तत्त्वे जसे की प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाण फक्त दुधामध्येच आढळते.
Buffalo Milk Production
Buffalo Milk ProductionAgrowon

डॉ. पुष्पनाथ चौगुले

Dairy Business News : आवश्यक तत्त्वे जसे की प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्त्वे योग्य प्रमाण फक्त दुधामध्येच आढळते. नेहमीच्या तापमानामध्ये दूध खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते. जर गाय,म्हशीची तब्येत दूध देण्याच्या वेळी बरोबर नसेल, जनावरे आजारी असतील तर काही जिवाणू दुधामध्ये येऊ शकतात. यासाठी स्वच्छ दूध निर्मिती आवश्यक आहे. याचबरोबरीने वापरण्यापूर्वी दूध गरम करणे गरजेचे असते.

आजारी जनावर,सभोवतालच्या वातावरणातून येणारी धूळ, कचरा, दूध काढावयाचे अस्वच्छ भांडे, अस्वच्छ जागेवरती दूध काढणे, अस्वच्छ भांड्यामध्ये दूध काढणे आणि ठेवणे, दूध काढण्याअगोदर कास स्वच्छ न धुणे, दूध काढणाऱ्या माणसाचे हात आणि कपडे अस्वच्छ असणे, दूध काढणारा माणूस आजारी असणे, दूध विक्रीस नेताना पाने किंवा कागदाने झाकणे, तापमान जास्त प्रमाणात असणे, दुधामध्ये भेसळ या कारणांमुळे दुधाची गुणवत्ता खराब होते.

Buffalo Milk Production
Solapur District Milk Union : सोलापूर जिल्हा दूध संघ अक्कलकोटला शीतकरण केंद्र उभारणार

१) दूध देणारी गाय, म्हैस निरोगी असली पाहिजे. तिला क्षयरोग किंवा कासदाह असे आजार नसावेत. यासाठी एक ठराविक कालावधीनंतर पशुवैद्यकाकडून जनावरांच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.

दूध काढण्याअगोदर कासेची स्वच्छता करणे गरजेचे आहे. यासाठी कासेला जिवाणू नाशक औषधाच्या द्रव्याने पुसून घेणे आणि नंतर पाण्याने कास स्वच्छ धुवावी.

जर एखाद्या सडामध्ये आजाराची लक्षणे दिसत असतील तर त्यातून काढलेले दूध फेकून दिले पाहिजे. अशा दुधामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असल्या कारणामुळे दूध खराब होण्याची क्रिया लवकर होते आणि आजार पसरण्याची सुद्धा शक्यता असते.

दूध काढण्यापूर्वी प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा वेगळ्या भांड्यामध्ये काढून ते दूध फेकून दिले पाहिजेत कारण त्यामध्ये सूक्ष्मजंतू असण्याची शक्यता असते. संपूर्ण दूध काढून झाल्यानंतर गाई, म्हशीचे सड निर्जंतुक द्रावणांमध्ये बुडवून घ्यावेत. जेणेकरून सभोवतालच्या वातावरणातील व गोठ्यामधील सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या कासदाहास प्रतिबंध करता येईल.

Buffalo Milk Production
Gokul Milk Union : ‘गोकुळ’तर्फे मँगो, व्‍हॅनिला लस्सी, मसाला ताकाचे उत्पादन

२) दूध काढणारी व्यक्ती निरोगी असायला हवी. त्याने नखे नियमित कापलेली असावीत. दूध काढण्याअगोदर हात निर्जंतुक करावेत. संबंधित व्यक्तीचे कपडे स्वच्छ असले पाहिजेत आणि दूध काढताना डोके कापडाने झाकलेले असावे. दूध काढताना बोलणे, थुंकणे, शिंकणे, खोकणे इत्यादी सवयींवर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

३) दूध काढण्याच्या आधी किंवा नंतर जनावरांना चारा द्यावा. दुधामध्ये माशा, धूळ, शेणाचे कण पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.जेव्हा दुधाला थंड केले जाते तेव्हा त्यामध्ये होणारी सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते, म्हणून दूध थंड तापमानात राहील त्याची काळजी घेतली पाहिजे. दूध उकळल्यानंतरच त्याचा वापर करावा.

४) स्वच्छ दूध उत्पादनामुळे ते दूध सेवन करणाऱ्या माणसांचे आरोग्य चांगल्या प्रकारे राखले जाते.

दुधामधून पसरणाऱ्या आजारांच्यामध्ये क्षय, टायफॉईड, प्यारा टायफॉईड, गॅस्ट्रो-एनटेरायटीस चा समावेश होतो. यामध्ये काही सूक्ष्मजीव जनावरांच्या कासेतून येतात. काही दूध काढणाऱ्या व्यक्ती द्वारे येतात.

५) जनावरांचा गोठा आणि दूध संकलनाची वेगळी जागा असावी. कास धुण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाचा वापर करावा. दूध काढण्यासाठी विशिष्ट आकाराची भांडी वापरावीत.

(विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन),श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी,जि.कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com