Silk : चॉकी सेंटरमुळे शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनात भर पडेल

शहराच्या मध्यभागी प्रांजल वाघमारे यांनी सुरू केलेल्या योगिनी चॉकी सेंटरमुळे रेशीम शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांना या सेंटरवर १० दिवसांच्या बाल्य रेशीम किटक अळ्या मिळणार आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

वर्धा : शहराच्या मध्यभागी प्रांजल वाघमारे यांनी सुरू केलेल्या योगिनी चॉकी सेंटरमुळे (Chocky Center ) रेशीम शेतकऱ्यांना (Silk Farmer) मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांना या सेंटरवर १० दिवसांच्या बाल्य रेशीम किटक अळ्या (Silk Worm) मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे १० दिवस कमी होणार असून शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनामध्ये (Cocoon Production) भर पडणार आहे, असे नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे उपसंचालक एम. बी. ढवळे यांनी वरुड येथील योगिनी चॉकी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Silk Farming
Silk : जालना मार्केटमध्ये एकाच दिवशी रेशीम कोषांची विक्रमी आवक

कार्यक्रमाला डॉ. कुशवा, रेशीम विकास अधिकारी पी.एस.पाडवी, ए.व्ही.वासनिक, वरिष्ठ तांत्रिक सहायक ए.एस.वाघमारे, बी.बी.खेडकर, वरिष्ठ क्षेत्र सहायक,डी.पी. भैरम, क्षेत्र सहाय्यक, प्रगतिशील शेतकरी अविनाश वाट, शिवप्रसाद लगारखाँ, भोजराज भागडे, विठ्ठल वाघमारे, विनोद चौधरी, अनंता हाडके, आनंद महाकाळकर, विवेक माहुरे, गणेश चौधरी, प्रशांत कडू, अविनाश शंभरकर, सचिन वाघमारे, विकास कावळे, संजय नेवारे उपस्थित होते. या वर्षी जिल्ह्यात १ लक्ष अंडिपुंज वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर विदर्भात लवकरच कोष मार्केट सुरू करण्यात येईल, असेही ढवळे यांनी सांगितले.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ए. एस. वाघमारे यांनी केले व आभार सुनंदा कासामपुरे यांनी मानले.त्यानंतर ढवळे यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची भेट घेऊन अंहिसा सिल्क या विषयावर चर्चा करून रेशीम बद्दल माहिती दिली. रेशीम उघोगाला खूप वाव असून इतर शेतीमध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. पण रेशीम शेतकऱ्यांनी एक बॅच घेऊन त्यापासून त्यांना ५० हजार ते ७० हजार एवढे उत्पन्न झालेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com