Silk : जालना मार्केटमध्ये एकाच दिवशी रेशीम कोषांची विक्रमी आवक

जालना येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू करण्यात आली.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

जालना : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत (Silk Market) शुक्रवारी (ता. १२) आजवरच्या एक दिवसातील उच्चांकी अशा १८ टन रेशीम कोषांची आवक (Record Silk Cocoon Arrival) झाली. या कोषांना २०० ते ५०० रुपये प्रति किलोचा दर (Silk Cocoon Rate) मिळाला.

Silk Farming
Silk Farming : रेशीम शेतीत बेण्याऐवजी तुती रोपे लागवडीवर भर

जालना येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांची गरज ओळखून प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू करण्यात आली. तत्कालीन राज्यमंत्री व जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांच्या पुढाकारातून ही बाजारपेठ सुरू करण्यात आली होती. या बाजारपेठेत इतर बाजारपेठांच्या तुलनेत कोष घेऊन येण्याला शेतकऱ्यांची मोठी पसंती दिसते आहे.

Silk Farming
Silk Park : नेत्यांच्या श्रेयवादात रखडला अमरावतीचा रेशीम पार्क

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या आर्थिक वर्षात जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत राज्याच्या विविध भागांतील जवळपास ५१४६ शेतकऱ्यांनी ४६२ रेशीम कोष विक्रीसाठी आणला ज्याची खरेदी केली गेली. या कोषाला सरासरी ५१३ रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता. शुक्रवारी रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत तब्बल १८ टन रेशीम कोष १४६ शेतकरी घेऊन आले. या कोषाची २०० ते ५०० रुपये प्रति किलो दरम्यानच्या दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली. जी यंदाच्या आर्थिक वर्षासह आजवरच्या जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेतील उच्चांकी राहिली. गतवर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये एकाच दिवशी १३३ शेतकऱ्यांनी १३ टन रेशीम कोष खरेदीसाठी आणले होते. तो उच्चांक या वेळी मोडल्या गेला.

जालना बाजारपेठेतील यंदाच्या रेशीम कोष खरेदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एप्रिल, मेमध्ये १२६ टन रेशीम कोष खरेदी केली गेली. जी आजवरची या महिन्यातील उच्चांकी खरेदी राहिली आहे. तर जूनमध्ये जवळपास नऊ टन व जुलैमध्ये जवळपास ५२ टन कोष खरेदी केला गेला, अशी माहिती या बाजारपेठेवर रेशीम विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवून असलेले क्षेत्र सहायक भरत जायभाये यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com