Sharad Pawar : साने गुरुजी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले

कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

पंढरपूर, जि. सोलापूर ः ‘‘कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी (Sane Guruji) दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले. त्या काळात सनातनी व्यवस्थेविरुद्ध (Sanatani System) ते मजबुतीने उभे राहिले. त्यासाठी मोठी चळवळ उभी केली. ही चळवण, आंदोलन विसरता येण्यासारखे नाही,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

Sharad Pawar
Sharad Pawar : मंथन शिबिरातील शरद पवारांची फोटो

साने गुरुजींनी विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना उघडे व्हावेत, यासाठी तनपुरे महाराज मठात केलेल्या उपोषणाला ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त तनपुरे महाराज मठात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे महाराज पुण्यतिथी निमित्त झाला.

Sharad Pawar
Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या ताकदीवर महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तन करू

या सोहळ्यात पवार यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मंचावर बद्रीनाथ तनपुरे महाराज, आमदार बबनराव शिंदे, पन्नालाल सुराणा, राजाभाऊ अवसक, माधव कारंडे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संभाजी दहातोंडे श्रदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा होता. विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा देव असूनही त्यामध्ये लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे गुरुजींनी त्या वेळच्या मुंबई सरकारकडे पत्र लिहून मागणी केली. विठ्ठल देवस्थानच्या पंच कमिटीकडे पत्रे लिहून आवाहन केले की सर्व माणसे देवाची लेकरे आहेत.

या लेकरांना मंदिरात प्रवेश मिळावा. यासाठी शेवटी गुरुजींनी १ मे ते १० मे या काळात पंढरपुरात उपोषण केले. संत तनपुरे मठात साकारलेले साने गुरुजींचे स्मारक या चळवळीची महती सांगणारे ठरेल. तनपुरे महाराज यांनीही समतेचा विचार सातत्याने जपला. ते लोकांच्या अंतरंगात आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com