Sharad Pawar : कार्यकर्त्यांच्या ताकदीवर महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तन करू

शरद पवार ः शिर्डीच्या शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
Nationalist Congress Party
Nationalist Congress PartyAgrowon

नगर ः ‘‘अनेकांची भाषणे ऐकण्याची संधी मी रुग्णालयात बसून घेतली. कार्यकर्त्यांना वैचारिक शक्ती देण्यासाठी हे शिबिर होत आहे. कार्यकर्त्यांच्या, तरुणांच्या, महिलांच्या ताकदीवर, हिमतीवर महाराष्ट्रात परिवर्तन करू. ही संधी लवकरच मिळेल,’’ असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिर्डी (जि. नगर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विचार मंथन शिबिराचा समारोप झाला. आजारी असूनही शरद पवार यांनी शिर्डीत येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘युवक, महिला, समाजातील लहान घटकांत काम करणाऱ्या अशा सगळ्यांची इच्छा शिबिराला यावे अशी होती. एवढं सांगतो की, राष्ट्रवादीचा लहान-मोठा कार्यकर्ता ताकदीने काम करतोय. मला सविस्तर बोलणे आज शक्य नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या तरुण, महिलांच्या ताकदीवर, हिमतीवर महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची संधी मिळेल.’’

Nationalist Congress Party
Crop Advisory : हरभरा पीक सल्ला

शरद पवार यांनी आजारी असल्याने मोजकेच भाषण केले. त्यानंतर पवार यांचे सविस्तर भाषण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले. ‘‘स्वातंत्र्यानंतर नगर जिल्ह्यात डाव्या विचाराच्या लोकांचा दबदबा निर्माण झाला. दत्ता देशमुख, अण्णा शिंदे, रावसाहेब शिंदे, पी. बी. कडू पाटील, भापकर, भाई सथ्था अशी मंडळ शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी काम करत होती.

नगरच्या दक्षिणेत दुष्काळी वातावरण असल्याने डाव्या विचार सरणीला पोषक वातावरण होते. मात्र अशा परिस्थितीत नगर जिल्ह्याच्या उत्तर भागात साखर कारखानदारी उभी राहिली. हरेगावला पहिला साखर कारखाना उभा राहिला. मुठभर धनिकांच्या हाती येथील साखर कारखानदारी होती. परंतु, नगर जिल्ह्यातून सहकाराला नवा मार्ग दाखवला गेला.

थोर अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली प्रवरानगर (लोणी) येथे सहकार तत्त्वावरील पहिला साखर कारखाना सुरु झाला. धनंजयराव गाडगीळ हे पहिले या कारखान्याचे चेअरमन होते. या प्रकल्पाला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, अण्णासाहेब पाटील यांनी अशा प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. या नेत्यांनी घरोघरी जाऊन कारखाना उभारणीसाठी निधी जमा केला.’’

यशवंतराव चव्हाणांनी नेतृत्व करत असताना कारखानदारीला पाठबळ दिले. राज्यभर सहकारी कारखानदारीचे जाळे उभे राहिले. शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, आबासाहेब निंबाळकर, मारुतराव घुले, बाबूराव तनपुरे, भाऊसाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांनी कारखानदारी बळकट केली,’’ असे पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. शेतकऱ्यांसाठी कार्यकर्त्यांनी भरीव काम करण्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केल्याचे वळसे पाटील म्हणाले.

Nationalist Congress Party
Crop Advisory : हरभरा पीक सल्ला

‘पंधरा दिवसांत काम सुरू करणार’

रुग्णालयात उपचार घेत असताना शरद पवार यांनी रुग्णालयातून येऊन शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या विचार मंथन मेळाव्यात मार्गदर्शन केले. ‘‘मला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्लानुसार अजून पंधरा दिवस जास्त बोलता येणार नाही. त्यानंतर मी नेहमीचे काम सुरु करेल. त्यानंतर मी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यासोबत बोलेन,’’ असे शरद पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com