Banana Export : निर्यातीच्या केळीचे २८००-३००० रुपये

खानदेशात निर्यातीच्या केळीचे दर २८०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत. केळीला निर्यातीसाठी मागणी आहे. परंतु आवक कमी आहे. सध्या रोज ८८ ते ९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक खानदेशात होत आहे.
Banana Export
Banana ExportAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात निर्यातीच्या केळीचे (Exportable Banana) दर २८०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत. केळीला निर्यातीसाठी (Banana Export) मागणी आहे. परंतु आवक कमी आहे. सध्या रोज ८८ ते ९० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक खानदेशात होत आहे.

आवक मागील आठ ते १० दिवसांच्या तुलनेत आणखी घटली आहे. थंडीचा प्रकोप यंदा अधिक होता. यामुळे निर्यातीच्या केळीची काढणी रखडली आहे.

काढणी हंगाम लांबला आहे. सध्या पिलबाग (खोडवा) केळीमधील केळीची काढणी जळगावमधील जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर भागात सुरू आहे.

नवती (जून व जुलैमधील लागवडीच्या बागा) केळीमधून काढणीला वेग आलेला नाही. थंडी कमी झाल्यानंतर ही आवक सुरू होईल. यंदा मार्चमध्ये आवक वाढेल, असे संकेत आहेत.

Banana Export
Banana Export : मागणीच्या तुलनेत निर्यातीच्या केळीचा तुटवडा

कमी दर्जाची केळीदेखील खानदेशात उपलब्ध नाही. या केळीचे दरही १४०० रुपये प्रति क्विंटलवर आहेत.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची सध्या रोज ७० ते ७५ ट्रक आवक होत आहे.

तेथेही कमी दर्जाच्या केळीचे दरही १४०० रुपयांवर आहेत. आवक कमी असल्याने दर वधारले आहेत. निर्यातदार कंपन्या खानदेशात खरेदी करीत आहेत.

सध्या रोज तीन कंटेनर केळीची खानदेशातून परदेशात निर्यात केली जात आहे.

Banana Export
Red Banana : लाल केळीचे आरोग्यदायी फायदे

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात निर्यातीची केळी अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. यामुळे या भागात एक ते दीड कंटेनर केळी रोज उपलब्ध होत आहे.

तर रावेर, यावल व चोपडा भागात मिळून दीड ते दोन कंटेनर केळी परदेशात निर्यातीसाठी उपलब्ध होत आहे.

निर्यातीच्या केळीचे दर मध्यंतरी किंवा मागील आठवड्यात ३१२५ रुपये प्रति क्विंटल, असे होते. त्यात काहीशी नरमाई आली आहे. पण किमान दर २८०० व कमाल दर ३००० रुपये प्रति क्विंटल, असा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com