Team Agrowon
मागणीच्या तुलनेत देशातून परदेशात केळीचा पुरवठा पुढेही शक्य नाही. निर्यातीच्या केळीचा तुटवडा कायम राहणार असून, दर टिकून राहतील, असे संकेत आहेत.
मागील काही महिन्यांत केळीची परदेशातील निर्यात वाढली आहे. कारण देशात अनेक भागांत केळीसंबंधी फ्रूटकेअर तंत्र कमाल शेतकऱ्यांनी आत्मसात केले आहे. यामुळे केळीची गुणवत्ता सुधारली आहे.
देशात केळीचे क्षेत्र आठ लाख ३० हजार हेक्टर आहे. राज्यातील क्षेत्र ८४ हजार हेक्टर असून, त्यात जळगावात सुमारे ५० हजार हेक्टवर केळी आहेत. देशाची केळी उत्पादकता ३६ टन प्रति हेक्टर आहे.
सध्या देशातून रोज ७५ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे.
आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशातील गोरखपूर भागात केळी काढणीवर नाही. फक्त तमिळनाडू व राज्यातील सोलापूर भागात अधिकची केळी परदेशात निर्यातीसाठी उपलब्ध होत आहे.
सोलापूर भागातून रोज १८ ते ३० कंटेनर केळीची निर्यात सध्या होत आहे. तर खानदेशातून रोज तीन कंटेनर केळीची परदेशात निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर प्रति क्विंटल ३१२५ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.
खानदेशात सध्या कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. यामुळे खानदेशात केळी हवी तेवढी निर्यातीसाठी उपलब्ध नाही. खानदेशातून मार्चमध्ये केळीची परदेशात निर्यात होईल.