Sugarcane Rate Control Board : राजू शेट्टी, खोत, पाटील यांना ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळले

Sugarcane Rate Control Board : राज्य सरकारकडून या नियंत्रण मंडळात शेतकरी नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
raju shetti
raju shettiagrowon
Published on: 
Updated on: 

State Government : राज्य सरकारकडून ऊस दर नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये अशासकीय आणि शासकीय अशा पद्धतीने या मंडळावरून नियुक्त्या केल्या जात होत्या. दरम्यान मागच्या कित्येक वर्षांपासून ऊस दराच्या मुद्दावरून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी रान उठवले होते.

यामुळे शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांना या ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य करण्यात आले होते. परंतु काल राज्य सरकारकडून या नियंत्रण मंडळात शेतकरी नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

काल (ता.१३) जुलै राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांना मंडळातून काढून टाकण्यात आले आहे.

मागच्या ११ महिन्यांपूर्वी राज्यातील सत्तातरानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी ऊस दर नियंत्रण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. या मंडळावरील अशासकीय प्रतिनीधींची पुन्हा नियुक्त्या करण्याबाबत राजू शेट्टी यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी पाठपुरावा केला होता. परंतु काल झालेल्या नियुक्त्यांमध्ये एकही शेतकरी नेता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

raju shetti
Raju shetti Son wedding : थेट ट्रॅक्टरवरुन लग्न मंडपात एण्ट्री ; राजू शेट्टींच्या मुलाचा हटके विवाह सोहळा

या दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केल्यास ते म्हणाले की, आधीच्या ऊस नियंत्रण मंडळावर शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या चळवळीतील नेत्यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, चळवळीतील नेत्यांना वगळून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे.

गेल्या साखर हंगामात गाळापापोटी कारखानदारांकडे अधिकचे पैसे जमा आहेत. हे पैसे देण्याची आम्ही मागणी करत आहोत. कारखानदारांना लाभ व्हावा म्हणून हे मंडळ कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

कारखानदार प्रतिनिधींमध्येही यापूर्वी विक्रमसिंह घाटगे, जयप्रकाश दांडेगावकर अशा साखर कारखानदारीतील जाणकार नेत्यांचा समावेश होता. आता प्रशांत परिचारक सोडले, तर तसे कोणी दिसत नाही, अशी नाराजीही शेट्टी यांनी व्यक्त केली

raju shetti
Raju Shetti : राजू शेट्टींचे विखे पाटलांना प्रत्त्युत्तर

शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुहास पाटील (माढा), सचिनकुमार नलवडे (कराड), पृथ्वीराज जाचक (इंदापूर), धनंजय भोसले (औसा), योगेश बर्डे (दिंडोरी) यांचा समावेश या मंडळावर करण्यात आला आहे.

सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांचा तसेच खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाचे संचालक दामोदर नवपुते, मानस अॅग्रो इंडस्ट्रीचे संचालक आनंदराव राऊत यांचाही मंडळात समावेश असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.