Team Agrowon
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ आणि समृद्धी यांचा नुकताच विवाह सोहळा पार पडला.
कुठल्याही प्रकारचा डामडौल न करता अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला
लग्न समारंभात नवरा-नवरीची एण्ट्री अतिशय महागड्या अंदाजात झाल्याचं आतापर्यंत पाहायला मिळाले.
नववधूला घरी घेऊन जाण्यासाठी नवरदेव नव्या कोऱ्या, महागड्या गाड्या, एवढंच काय तर हेलिकॉप्टरनेही एन्ट्री होत असते.
कोल्हापूर जिल्ह्यात झाले्या विवाह सोहळ्यात नवरदेवाने लग्न मंडपात अशी भन्नाट एण्ट्री केली की वऱ्हाडीही चाट पडले.
लग्नाची वेळ जवळ येताच वऱ्हाडी मंडळी नवरदेवाच्या येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात नवरदेव सौरभ शेट्टी, वडील राजू शेट्टी आणि आईची एण्ट्री थेट ट्रॅक्टरवरून झाली.
नवरदेवाची वरात वाजत गाजत लग्न मंडपात पोहचली.
पुढच्याच क्षणी सगळे या सोहळ्यात सामील झाले. ट्रॅक्टरवरून एण्ट्री केलेल्या या नवरदेवाच्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.