Raju Shetti : राजू शेट्टींचे विखे पाटलांना प्रत्त्युत्तर

Raju Shetti : राज्यामध्ये तलाठ्यापासून ते मंत्रालयातील सचिवापर्यंत सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Raju Shetti Criticize Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बदल्यांबाबत राजू शेट्टींनी मुक्ताफळे उधळू नयेत असे विधान केले. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्त्युत्तर दिले. राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारमधील वजनदार मंत्री आहेत.

खरोखरच विखे पाटील यांना बदल्यांमध्ये पारदर्शकता आली असल्याचे दाखवून द्यायचे असेल तर त्यांनी विधी व न्याय विभागाच्या धर्तीवर राज्यातील सर्व विभागाच्या बदल्या ऑनलाइन कराव्यात. असा थेट इशारा शेट्टींनी दिला.

शेट्टी पुढे म्हणाले की, राज्यामध्ये तलाठ्यापासून ते मंत्रालयातील सचिवापर्यंत सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे.

या सगळ्याचे मूळ शोधल्यास त्याचे कारण राज्यातील बदल्यांमध्ये होत असलेली सौदेबाजी व दलाली असल्याचे स्पष्ट आहे. यामुळेच मला ऊस दराच्या आंदोलनाकडून बदल्यांच्या पारदर्शकतेमध्ये लक्ष घालावे लागत असल्याचे शेट्टी म्हणाले.

Raju Shetti
Raju Shetti : राजू शेट्टींकडून ही अपेक्षा नाही, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

राज्यातील विविध विभागांच्या बदल्यामध्ये मंत्र्यांनी सौदेबाजी व दलाली न करता या सर्व बदल्या पैसे घेऊन केल्या आहेत हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. गेल्या दोन तीन महिन्यापासून राज्यात ज्या बदल्या झाल्या त्या बदल्यांना किती वेळा स्थगिती देण्यात आली.

किती वेळा झालेल्या ऑर्डर बदलण्यात आल्या. या ऑर्डर बदलल्यानंतर किती अधिकारी मॅटमध्ये गेले. याची तपासणी विखे पाटलांनी केल्यानंतर विखे पाटलांच्या हे चांगलंच लक्षात येईल असे शेट्टी म्हणाले.

राज्यातील गृह, कृषी, महसूल, ग्रामविकास, नगर विकास या खात्यामध्ये तर बदल्यासाठी अक्षरशा अधिकाऱ्यांची लय लूट करण्यात आलेली आहे. हे सर्व जगजाहीर असताना मंत्री विखे पाटील हे उजळमाथ्याने दलाल व सौदेबाज लोकांचे कशासाठी समर्थन करत आहेत हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न असल्याचे शेट्टी यांनी सांगितलं.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या व त्यासाठी द्यावे लागणारे पैसे ,मुलांचे शिक्षण व आरोग्य यामुळे अधिकारी वर्गात प्रचंड रोष निर्माण होऊ लागलेला आहे. सदरच्या बदल्या करत असताना स्थानिक जिल्ह्यातील पालकमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचा वजनदार नेता आमदार, खासदार यांच्या शिफारशीने या बदल्या केल्या जात असल्याचाही आरोप शेट्टी यांनी केला.

जर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात हिम्मत असेल तर मी केलेली मुक्ताफळे उधळून लावण्यासाठी व त्रासलेल्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी राज्यातील सर्व विभागाच्या बदल्या ऑनलाइन कराव्यात. मग राज्यातील जनतेला “दूध का दूध व पाणी का पाणी” काय आहे हे समजेल असा घाणाघात शेट्टींनी केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com