Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कोकणात पावसाचा अंदाज

पावसाला पोषक हवामान झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon
Published on
Updated on

पुणे : पावसाला पोषक हवामान (Favorable Weather Condition For Rain) झाल्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी (Rainfall) लावली आहे. आज (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह (Cloudy weather) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Rain Update : सर्वदूर पावसाची शक्यता

पश्चिम उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

Weather Update
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर, तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडला. आज (ता. ३०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ३०) राज्यात पावसाचा इशारा. (सौजन्य : हवामान विभाग)

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर.

गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : सांताक्रूझ, कुलाबा, जव्हार प्रत्येकी १०,

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १००, शिरपूर ४०, राहूरी, सुरगाणा प्रत्येकी ३०, खंडाळा, शेवगाव, चास, नेवासा प्रत्येकी १०, जामखेड, इंदापूर, पेठ, लोणावळा, वेल्हे, मुक्ताईनगर प्रत्येकी १०.

मराठवाडा : घनसावंगी ७०, माजलगाव ५०, धालेगाव ४०, धर्माबाद, वाशी प्रत्येकी ३०, पाथरी, अंबड, नांदेड, मानवत, लातूर प्रत्येकी २०, वाडवणी, अर्धापूर, नायगाव खैरगाव, सोनपेठ, औंढा नागनाथ, निलंगा, शिरूर अनंतपाळ, पालम, कळंब, परभणी प्रत्येकी १०.

विदर्भ : लाखणी ५०, सडकअर्जूनी ३०,

गडचिरोली, अहिरी, देवरी, मुलचेरा प्रत्येकी २०, सालकेसा, साकोली, मोहाडी, तेल्हारा, धानोरा, यवतमाळ, भिवापूर, जळगाव जामोद, समुद्रपूर, सिरोंचा, लाखंदूर, गोरेगाव, झरीजामणी, दारव्हा, पांढरीकवडा प्रत्येकी १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com