
पुणे : मराठवाडा, (Marathwada) मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (ता. २८) राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) पाऊस पडत होता. आज (ता. २९) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वायव्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर अंदमान समुद्रापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज (ता. २९) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सूनची परतीची वाटचाल ‘जैसे थे’
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातील राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून काढता पाय घेतला. त्यानंतर तब्बल आठ दिवस उलटूनही बुधवारी (ता. २७) मॉन्सूनच्या परतीची सीमा ‘जैसे थे’ आहे. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर. विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये. (स्रोत : हवामान विभाग)
कोकण : कुलाबा २०.
मध्य महाराष्ट्र : सटाणा, दिंडोरी प्रत्येकी ३०, पारनेर, सिन्नर, हर्सूल, चांदवड प्रत्येकी २०, जेऊर, पाडेगाव, येवला, कळवण, सुरगाणा प्रत्येकी १०.
मराठवाडा : अंबड ६०, देगलूर ४०, उस्मानाबाद,
मंथा प्रत्येकी ३०, गंगापूर, परभणी प्रत्येकी २०, घनसांगवी, माजलगाव, औरंगाबाद, परतूर प्रत्येकी १०.
विदर्भ : पारशिवणी ३०, कोर्ची २०, एटापल्ली, धानोरा, हिंगणा, कळंब, सावनेर, आरमोरी, कुरखेडा प्रत्येकी १०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.