पुणे : वायव्य भारताच्या बहुतांशी भागातून मॉन्सूनने (Monsoon Return From North East India) काढता पाय घेतला आहे. यातच राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरूच आहे. आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह (Cloudy Weather) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या प्रणालीपासून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता. १) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम
मॉन्सूनने थांबलेला परतीचा प्रवास पुन्हा सुरू करत गुरुवारी (ता. २९) संपूर्ण पंजाब, चंडीगड, राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालिया पर्यंत असून, शुक्रवारी (ता. ३०) ही सीमा कायम होती.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
शुक्रवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण : मोखेडा २७, माणगाव ३१, संगमेश्वर २३, अंबरनाथ ४५.
मध्य महाराष्ट्र : अकोला ३९, गगनबावडा २२, दिंडोरी २२, ओझरखेडा २१.४, पेठ २२.
विदर्भ : सालकेसा २७.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.