Agriculture Department : पणन संचालक रसाळ यांच्या नियुक्ती रद्दला स्थगिती

पणन संचालक विकास रसाळ यांच्या नियुक्ती रद्दच्या राज्य शासनाच्या आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली आहे.
APMC Election
APMC ElectionAgrowon

पुणे : पणन संचालक (Marketing Director) विकास रसाळ यांच्या नियुक्ती रद्दच्या राज्य शासनाच्या आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) स्थगिती दिली आहे. यामुळे रसाळ पुन्हा सोमवारी (ता. ५) पदभार स्वीकारणार आहेत.

APMC Election
Agriculture Department : पणन संचालकपद ठरले औट घटकेचे

गुरुवारी (ता.१) पदभार घेत, एक दिवस काम केल्यावर त्याच दिवशी सायंकाळी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती रद्द केली. पणन सहसंचालक विनायक कोकरे यांकडे अतिरिक्त पदभार देण्याचे आदेश दिले होते. मात्र रसाळ यांनी ‘मॅट’मध्ये जात राज्य शासनाच्या आदेशाला स्थगिती मिळविली आहे.

APMC Election
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गालगत ‘पणन’ उभारणार गोडाऊन

रसाळ यांनी पणन संचालकपदावर एकच दिवस काम केले. त्यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द केल्याने त्यांचे पद औट घटकेचे ठरले होते. पणन संचालक हे पद सहकार क्षेत्रातील बिगर सनदी अधिकाऱ्यांनंतरचे सर्वात मोठे पद आहे. हे पद अप्पर आयुक्त विशेष निबंधक श्रेणीतील आहे. हे पद अपर निबंधक पदश्रेणीत आणून यावर विकास रसाळ यांची नियुक्ती केली होती. या पदस्थापनेवरून सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल झाल्यानंतर सहकार मंत्रालयात मोठा गदारोळ झाला होता.

‘सहकार’, ‘पणन’मधील पदोन्नत्या रखडल्या

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सहकार आणि पणन विभागातील पदोन्नत्या रखडल्या आहेत. यामुळे पणन संचालकपदासाठी पात्र असलेल्या अपर आयुक्त विशेष निबंधक या पदासाठी एकही जण पात्र नसल्याने हे पद अवनत करून अपर निबंधक असलेल्या रसाळ यांना पणन संचालक पदी नियुक्ती दिली होती.

या नियुक्तीला एका वरिष्ठ गटाने विरोध करत नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती मिळविली. तर या सर्व प्रक्रियेत सहकार आणि पणन सचिव परदेश दौऱ्यावर असताना रसाळ यांची नियुक्ती झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com