Samruddhi Highway : समृद्धी महामार्गालगत ‘पणन’ उभारणार गोडाऊन

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : खासगी बाजारात कापसाचे दर चांगले आहेत. त्यामुळे पणन महासंघाकडे येणारी कापसाची आवक घटली आहे. परिणामी, पणन महासंघ आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Cotton | Agrowon

पणनचे आणखी एक उत्पन्नाचे साधन तयार व्हावे, यासाठी समृद्धी महामार्गालगत पणन महासंघ गोडाऊन उभारण्याच्या तयारीत आहे.

Cotton | Agrowon

शिवाय, बाभूळगाव येथे चाळीस गाळे बांधण्याचाही विचार पणन करीत आहे. नुकत्याच झालेल्या पणनच्या आमसभेत या विषयावर चर्चा झाली असून लवकरच पणनचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक जिल्ह्या दौरा करणार आहेत.

Cotton Center | Agrowon

एकेकाळी पणनचा डोल्हारा मोठा होता. कापूस खरेदीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल पणन महासंघ करीत होता. परंतु एकाधिकार संपुष्टात आला.

Cotton | Agrowon

त्यासोबतच खासगी बाजारात दरही चढे असल्याने पणनकडे कापूस आवक कमी झाली. त्यामुळे पणन महासंघाच्या अडचणीत वाढ झाली.

Cotton Center | Agrowon

त्यावर पर्याय म्हणून समृद्धी महामार्गालगत असलेल्या पणनच्या जागेवर मोठमोठे गोडाऊन तयार करण्याचा विचार पणन संचालकांनी मांडला. आमसभेत या विषयाला मंजुरी मिळाली आहे. 

Highway | Agrowon

या संदर्भात वखार महामंडळासोबत चर्चा झाली. गोडाऊन तयार करून ती वखार महामंडळाला द्यायची, यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि पणनचाही कारभारही सुरू राहणार आहे.

Samruddhi | Agrowon

त्यामुळे धामणगाव, देवगाव तसेच बाभूळगाव या ठिकाणी पणन पायलट प्रोजेक्ट म्हणून गोदाम तयार करण्याच्या विचारात आहे. शिवाय, बाभूळगाव येथे चाळीस दुकाने काढण्याचा विचारही पणन महासंघाचा आहे. 

Samruddhi | Agrowon

जागेची पाहणी करण्यासाठी पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच व्यवस्थापकीय संचालक लवकरच पाहणी करणार आहे. पणन महासंघाची ही योजना पूर्णत्वास आल्यास शेतकऱ्यांना निश्‍चितच याचा फायदा होणार आहे.

Samruddhi highway | Agrowon
cta image | Agrowon