Rabi Sowing : धुळ्यात ४० हजार हेक्टरवर बहरणार रब्बीचा हंगाम

काही प्रकल्पांचा अपवाद वगळता प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. यंदा सुमारे ४० ते ४५ हजार हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असे संकेत आहेत. जिल्ह्यात मागील दोन वर्षे ११० टक्क्यांवर रब्बीची पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

धुळे : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगाम जोमात (Rabi Season) असेल, असे संकेत आहेत. काही प्रकल्पांचा अपवाद वगळता प्रकल्पांत मुबलक जलसाठा (Water Reservoir) आहे. यंदा सुमारे ४० ते ४५ हजार हेक्टरवर रब्बी हंगाम उभा राहील, असे संकेत आहेत. जिल्ह्यात मागील दोन वर्षे ११० टक्क्यांवर रब्बीची पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : दोन लाख हेक्टरवर होणार रब्बी पिकांची लागवड

रब्बीत हरभरा व दादर ज्वारी अधिक असते. तसेच मका, गहू, हरभरा व पुढे उन्हाळ बाजरीची पेरणी केली जाते. जानेवारीत कांदा लागवडही यंदा बऱ्यापैकी असेल. कांद्याबाबत ठोस अंदाज अद्याप व्यक्त केला जात नसला तरीदेखील तीन ते चार हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड केली जाईल, असे संकेत आहेत. जिल्ह्यात ज्वारीची सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी होईल.

Rabi Sowing
Jute Crop : ताग पीक जोमात

हरभऱ्याची देखील १८ ते २० हजार हेक्टरवर पेरणी होवू शकते. त्यापाठोपाठ गहू, मका, यांची पेरणी होईल. पेरणी ११० टक्क्यांवर होईल. जिल्ह्यातील पांझरा, बुराई, सोनवद हे प्रकल्प १०० टक्के भरले. मालनगाव प्रकल्पातच कमी जलसाठा आहे. तसेच अनेर, अमरावती या प्रकल्पांतही जलसाठा मुबलक आहे. अनेर प्रकल्पातून शिरपूर तालुक्यात सिंचनासाठी रब्बी व पुढे उन्हाळ हंगामासाठीदेखील पाणी दिले जाईल.

Rabi Sowing
Crop Damage : सततच्या पावसामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी

शिरपुरात रब्बी हंगाम जोमात असतो. याच भागात अधिकची पेरणीदेखील केली जाते. पण पांझरा प्रकल्पात जलसाठा मुबलक असल्याने साक्री, धुळे तालुक्यासही चांगला लाभ होईल. रब्बी हंगाम लक्षात घेता मका, गव्हाचा पुरवठा बाजारात विविध कंपन्या लवकरच करतील. त्यात मका बियाण्याचा पुरवठा काही कंपन्यांनी शिरपूर व इतर परिसरात केला आहे.

अनेक शेतकरी दसरा सणानंतर हरभऱ्याची पेरणी करतील. त्यामुळे हरभरा बियाण्याचीदेखील बाजारात उपलब्धता करून देण्याचे नियोजन कंपन्यांनी केले आहे. रब्बीसाठी जिल्ह्यात खतांची मागणीदेखील असेल. त्याची तयारी कृषी विभागाने केली असून, खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली आहे.

यानुसार खतांचा पुरवठा अपेक्षित आहे. युरिया, १०.२६.२६ या खतांची अधिक मागणी रब्बीत असणार आहे. यानुसार कृषी विभाग नियोजन करीत असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com