
औरंगाबाद : मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर सातही जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सततच्या पावसाने (Heavy Rainfall) नुकसान झालेल्या शेती पिकाच्या (Crop Damage) भरपाईचा (Crop Damage Compensation) प्रश्न अजूनही अधांतरी आहे.याप्रकरणी शासन निर्णय घेण्याची प्रतीक्षा असतानाच पुन्हा एकदा विविध भागात अतिवृष्टी (Heavy Rain) तसेच रोगांचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेती पिकाच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा मराठवाड्यात अतिवृष्टीने जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या सहा जिल्ह्यातील १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरवरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर शासनाने मदतीपोटी १००८ कोटी ३१ लाख मराठवाड्यासाठी पाठविले.
याशिवाय गोगलगाईच्या आक्रमणामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात जवळपास १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांच्या ७२,४९१ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी शासनाने समितीच्या अहवाल अंतिम जाहीर केलेली ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत तिन्ही जिल्ह्यासाठी पाठवली.
परंतु अजूनही सततच्या पावसाने नांदेड वगळता मराठवाड्यातील ज्या सात जिल्ह्यातील ६ लाख ९१ हजार ९२४ शेतकऱ्यांच्या ४ लाख ३९ हजार ६२० हेक्टर शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्या नुकसानीच्या भरपाई पोटी अपेक्षित असलेले ५९९ कोटी ७ लाख ९० हजार रुपये कधी मिळणार हा प्रश्न आहे.
त्याविषयी अजून शासन स्तरावरून निर्णय झाल्याने तो निर्णय घेतला जाणार की नाही हा प्रश्न आहे. दुसरीकडे सततच्या पावसाने व मध्यंतरी प्रदीर्घ उघडीप दिलेल्या पावसाने व पुन्हा काही मंडळात अतिवृष्टी होत असल्याने शेती पिकाच्या नुकसानीत भरत पडण्याचीच शक्यता जास्त आहे.
सततच्या पावसाने शेतीपिकांचे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
जिल्हा.... शेतकरी.... बाधित क्षेत्र
औरंगाबाद... १६४१०... १२६७९
जालना... ११५०.... ६७८
परभणी... ४४८६... २५४५
हिंगोली.... १३९८००...९६६७७
बीड... १६०... ४८.८०
लातूर.... ३७४६६०...२१३२५१
उस्मानाबाद... १५५२५८...११३७४१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.