पाली/बेणसे ः ‘‘कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा (Agriculture Economy) कणा मानला जातोय, मात्र आज हवामानबदल (Climate Change), नैसर्गिक आपत्तीमुळे ()Natural calamity शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान बदल संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर (Dr. Anil Kakodkar) यांनी केले.
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने मुंबईत हवामानबदलाचा फलोत्पादनावर होणारा परिणाम, त्यानुसार आवश्यक असलेली कृषिप्रक्रिया, सिंचनव्यवस्था यावर शुक्रवारी (ता. १४) परिषदेचे आयोजन केले होते.
मागील चार ते पाच वर्षांत हवामानबदल हे जागतिक आव्हान ठरले आहे. त्याचा मोठा परिणाम कृषी फलोत्पादन क्षेत्रावर झाला आहे, या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठीच परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.
फोर्ट भागातील के. दुभाष मार्गावरील जहांगीर कला दालनामागील एम. सी. घिया सभागृहात परिषद पार पडली. या वेळी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ. सुजाता सक्सेना, स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक अजयकुमार सिंह, मुंबई शेअर बाजाराचे समीर पाटील, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी संचालक डॉ. यू. व्ही. महाडकर यांच्यासह कृषी तसेच सिंचन क्षेत्रातील मान्यवरांनी
मार्गदर्शन केले.
या परिषदेत या वेळी पृथा शक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षा डॉ. भाग्यश्री टिळेकर, सिंदखेड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेशअप्पा कदम, मुलुख पर्यटन दौडचे संचालक बाळासाहेब पिलाने, बारामती येथील प्रल्हाद वरे, फलटण येथील कल्याण जगन्नाथ काटे, फनसकिंग मिथिलेश देसाई, अजय तेंडुलकर, सिंधुदुर्ग येथील विष्णू मौर्ये, म्युनिसिपल मजदूर संघाचे वसंत जाधव, रॉयल कॉलेज डोंबिवलीचे प्राचार्य डॉ. विवेक पाटील आदी रायगड कोकणासह राज्यातील कृषी क्षेत्रातील प्रगतिशील शेतकरी व मान्यवरांचा डॉ. काकोडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंबा बागायतदार उत्पादक संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.