Climate Change : पाणीदार गावाकडे करा वाटचाल

पाणीदार गाव करण्यासाठी फारशी यंत्रणा किंवा साधनांची गरज नसते. फक्त गरज असते ती इच्छाशक्तीची आणि दिशादर्शनाची. महाराष्ट्र शासनातील कृषी विभागाच्यामार्फत ही कार्यवाही सातत्याने केली जाते. त्याचप्रमाणे जलसाक्षरता केंद्र, यशदा यांच्या माध्यमातून पाण्याचा ताळेबंद करण्याचे प्रवीण प्रशिक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

डॉ.सुमंत पांडे

मागील काही वर्षांपासून जगभरात आपण अनियमित पर्जन्यमान (Irregular Rainfall) आणि त्याचे परिणाम अनुभवत आहोत. तीव्र पाणी टंचाई (Water Shortage), पिकांना अगदी आवश्यक असलेल्या कालावधीमध्ये पाणी उपलब्ध (Water Availability) नसणे, त्याचप्रमाणे काही भागांमध्ये अति पर्जन्यामुळे पुरासारखी परिस्थिती (Flood) निर्माण होते आहे. याची वारंवारिता वाढली आहे. जागतिक स्तरावरील स्थिती पाहता अमेरिका विशेषतः दक्षिण अमेरिका, युरोप खंड, आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ (Drought) आहे आणि येथील तापमानामध्ये वाढ झाली आहे.

चीनमधील परिस्थिती ः

चीनमधील दुष्काळ हा विचार करायला लावणारा आहे. चीनमध्ये सध्या आलेले दुष्काळाचे संकट हे प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे आहे. निसर्गाला विचारात न घेता,नद्यांना गुलाम करण्याच्या अति महत्वाकांक्षेमुळे केलेल्या जलसंचयामुळे घडले असावे असे तज्ञांची मांडणी आहे.

चीन मधून वाहणाऱ्या बहुतांशी सर्व नद्या या तिबेटच्या पठारावरून निघतात. यापैकी यलो आणि यांग्झी या दोन प्रमुख नद्यांचा आपण विचार करूयात. यापैकी यलो नदी ही नेहमी तुटीच्या छायेत असणारी नदी आहे. यांग्झी नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. या नदीवर बहुतांशी महाकाय धरण बांधलेली आहेत.

मात्र आता या जलाशयात आज पाण्याचा टिपूस देखील नाही. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेला होत आहे. तथापि मागील पाच दशकांमध्ये चीनने उद्योग व्यवसायात मोठी भरारी घेतलेली असून अनेक उद्योग या नदी क्षेत्रात येतात. या उद्योगांना पाण्याची उपलब्धता याच जलाशयातून होते, ते उद्योग आज संकटात आहेत. जलाशय, नद्यांमध्ये पाणी नाही, अशा परिस्थितीमध्ये विद्यूत निर्मितीवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे.

आशियातील परिस्थिती ः

आपण थोडे भारत आणि पाकिस्तानचा मधील स्थितीचादेखील विचार करूयात. नुकताच पाकिस्तानमध्ये आलेला पूर विशेषतः सिंधू नदी खोऱ्यातून आलेला पूर हा खूप बोलका आहे. भारताला देखील पर्जन्याचे विचलन आणि तापमान या बाबीने ग्रासले आहे. महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, अनावृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

कोकणामध्ये भात कापणीला आला तरी पावसाने उसंत दिलेली नाही. मराठवाडा, विदर्भामध्ये सोयाबीन हातचे जाण्याची स्थिती आहे. ही परिस्थिती वारंवार येते आहे आणि येणार आहे. त्यामुळे याचा अगदी ग्रामस्थांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत सूक्ष्म नियोजन करून विचार करणे गरजेचे आहे. यासाठी पाणीदार गाव आणि ग्रामविकास आराखडा या बाबत नव्याने विचार करावा लागणार आहे.

Water Conservation
Water Project : नऊ वर्षांत तिसऱ्यांदा टेंभापुरी तुडुंब

पाणीदार गावाची संकल्पना ः

वातावरणाच्या बदलाशी समरूप असणारे गाव किंवा ज्या गावाला पाण्याचा उपयोग समजलेला आहे, या गावाला पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन पूर्ण समजलेले आहे अशा गावांना आपण पाणीदार गाव असे संबोधतो. गावाचे जलनियोजन, जलव्यवस्थापनाची अतिशय काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे, अशा गावाला पाणीदार गाव म्हणतात. सध्याच्या काळात ग्रामविकास आराखडा तयार करताना हवामान बदलाचा विचार करावा लागणार आहे.

Water Conservation
Water Pollution : पाण्यातील प्रदूषण दूर करण्याची सोपी पद्धती शोधली

१) गावच्या कारभाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य,गावांमधील तरुण, युवक-युवती, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, या सर्वांनी एकत्र विचार करणे गरजेचे आहे.

२) गावातील पाण्याचा हिशोब मांडावा. माझ्या गावाच्या पाण्याची गरज किती ? पाण्याचा वापर किती,त्याच प्रमाणे भूगर्भात मुरणारे पाणी ,बाष्पीभवन होणारे पाणी आणि शिल्लक पाणी

याचा ताळेबंद मांडावा. हा हिशोब तुटीचा असल्यास नियोजन वेगळे लागेल आणि अधिकच असेल तर वेगळे नियोजन करावे लागेल. थोडक्यात पाण्याचा ताळेबंद करणे गरजेचे आहे.

३) उपलब्ध पाण्याचे स्रोत कोणते आहेत त्याचा अभ्यास करावा.

गाव शिवाराचे नकाशे ः

१) पाणीदार गाव करण्यासाठी फारशी यंत्रणा किंवा साधनांची गरज नसते. फक्त गरज असते ती इच्छाशक्तीची आणि दिशादर्शनाची. महाराष्ट्र शासनातील कृषी विभागाच्यामार्फत ही कार्यवाही सातत्याने केली जाते. त्याचप्रमाणे जलसाक्षरता केंद्र, यशदा यांच्या माध्यमातून पाण्याचा ताळेबंद करण्याचे प्रवीण प्रशिक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. पर्जन्यामापकाने पाण्याचा ताळेबंद काढण्याची सोपी पद्धत आहे.

त्यासाठी आपल्या गावामध्ये किती पाऊस पडला याची नोंद काटेकोरपणे करावी. अचूक नोंद असल्यास पाण्याचा ताळेबंद देखील अचूक निघतो. गाव शिवाराचे नकाशे आपल्याकडे उपलब्ध आहेत. ग्राम विकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय यांनी उपग्रहावरून नकाशे प्राप्त करण्याची पद्धत विकसित केली आहे. ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानुसार आपल्या गावचा नकाशा तयार करू शकतो.

प्रत्यक्ष गावची फेरी करून सोबतचा नकाशावर नोंदी करून आपल्या गाव शिवाराची काय स्थिती आहे हे जाणून घेता येऊ शकते.

२) नोंदी करताना संपूर्ण पाणलोट अगदी डोळसपणे फिरून पहावा. सोबत कॅमेरा,टेप घेऊन जाणे गरजेचे आहे.

१९७०च्या दशकापासून गाव निहाय बंधारे जलाशय शासनाच्या मार्फत निर्मिती सुरवात झालेली होती तथापि काही भूभागावर विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा जिल्ह्यातील आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये (रूपांतरित खडकाच्या प्रदेशांमध्ये सुमारे शंभर वर्षांपूर्वी) मालगुजारी तलाव उभारण्यात आलेले आहेत. लघु सिंचन तलाव मोठ्या प्रमाणावर आहेत.तर कोकणामध्ये झऱ्यांच्या नोंदी आवश्यक आहेत.

३) ग्रामपंचायत हे एकच केंद्र आहे ज्या ठिकाणी सर्व योजना आपल्याला एकत्रितपणे राबवता येऊ शकतात. प्राप्त निधी आणि कामाच्या आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम ठरवून काम करावे. सगळेच काम एका वर्षात होणे शक्य नसते. तथापि काही कामाची निश्चित दिशा आणि धोरण ठरून दोन वर्षे किंवा तीन वर्षे सातत्याने ते काम करणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com