Pearl Millet Verity : ‘बाएफ’च्या बाजरीच्या चारा वाणांना राष्ट्रीय मान्यता

पशुधन विकासाच्या कार्यक्रमाला बळकटी आणण्याकरिता बाएफ संस्थेने १९७८ साली चारा पीक विकास कार्यक्रमाला सुरवात केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेने या प्रकल्पास अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.
MIllet
MIlletAgrowon
Published on
Updated on

पुणे ः पशुधन विकासाच्या कार्यक्रमाला बळकटी आणण्याकरिता बाएफ (BAIF) संस्थेने १९७८ साली चारा पीक विकास कार्यक्रमाला (Crop Development Program) सुरवात केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) या प्रकल्पास अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या केंद्राने संशोधित केलेल्या बाजरी पिकाच्या (Pearl Millet Crop) ‘बाएफ बाजरा-१’, संकरित नेपियरचा ‘बाएफ संकरित नेपियर-१०’, ‘बाएफ संकरित नेपियर-११’, ‘बाएफ संकरित नेपियर-१४’ या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

MIllet
Millet Processing : भरडधान्यांचे प्रक्रियामूल्य वाढवा...

या बरोबरीने संस्थेच्या उरुळीकांचन येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राने चाऱ्यासाठी बाजरीच्या ‘बाएफ बाजरा-५’ आणि ‘बाएफ बाजरा-६’ ही नवीन वाण विकसित केले आहेत. या दोन वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली आहे. हे दोन्ही वाण महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागवडीस प्रसारित करण्यात आली आहेत.

MIllet
Millet Dish : मोहाचे फुलांचे लाडू खाल्ले का ?

संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे, गट उपाध्यक्ष (संशोधन व पशुधन विकास) डॉ. अशोक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाचे प्रमुख प्रमोदकुमार ताकवले, कृषी विद्यावेत्ता राहुल काळे, वरिष्ठ संशोधन अधिकारी सागर जडे यांनी वाणांच्या विकासासाठी पुढाकार घेतला होता.

वाणांची वैशिष्टे ः

१) पेरणीपासून ५५ ते ६० दिवसांमध्ये पहिल्या कापणीस तयार. दुसरी व तिसरी कापणी ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने. उन्हाळी हंगामात कमी पाण्यामध्ये व कमी कालावधीत जास्त चारा निर्मितीसाठी उपयुक्त.

२) उंच वाढणारे, रुंद, लांब व लव विरहित पाने, हिरवा पालेदारपणा, ३ ते ६ फुटवे, जाड रसाळ व मऊ ताट, जास्त हिरवा चारा उत्पादन देणारे, जोमाने वाढणारे व जलद पुनरुत्पादन.

३) ९ ते १० टक्के प्रथिने, १८ ते २० टक्के शुष्क पदार्थ. एकूण पचनीय घटक ५७ ते ५८ टक्के.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com